निलंगा तालुक्यातील माकणी येथे विज पडून म्हैस ठार..
निलंगा तालुक्यात विज पडून म्हैस ठार..
लातूर,दि.११
मौजे माकणी थोर ता. निलंगा जिल्हा लातूर येथील शेतकरी तुकाराम पांडुरंग सुर्यवंशी यांच्या शेतात विज पडून म्हैस दगावल्याची घटना सोमवार (दि १०) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
मागच्या दोन दिवसापासून निलंगा तालुक्यातील विविध गावात विजेच्या कडकडाट जोरदार पाऊस कोसळत असून सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील माकणी थोर येथील शेतकरी तुकाराम पांडुरंग सुर्यवंशी यांच्या शेतात विज पडून म्हैस दगावल्याची घटना घडली. घटनेची माहिती तलाठी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली असून घटनेचा मंगळवारी पंचनामा करण्यात येणार आहे. या घटनेमुळे जवळपास ६० ते ७० हजार रुपयेचे नुकसान झाले आहे .
Comments
Post a Comment