निलंगा तालुक्यातील कासारसिरसी शहरातील विकास कामे तात्काळ पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी..
कासारसिरसी शहरातील विकास कामे त्वरित पूर्ण करा नागरिकांची मागणी..
कासारसिरसी (शाम मुळजकर)
निलंगा तालुक्यातील कासार सिरसी शहरांतर्गत राबवण्यात येत असलेली अनेक विकासकामे संथ गतीने सुरू असून ती सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावीत शहर स्वच्छतेसह शाळा परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.
कासार सिरसी शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या शुद्ध पेयजल योजनेचे काम संथ गतीने चालू असून संभाव्य पावसाळा अशुद्ध पाणी व त्यातून उद्भभवणारे आजार याचा समन्वय साधून हे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे अंथरण्यात येत असलेल्या मुख्य जलवाहिनीचे काम संथगतीने होत असून गेल्या दीड वर्षापासून शहराच्या काही प्रभागात पाणीपुरवठा बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांतून करण्यात येत आहेत.
कासार शिरशी उमरगा मार्गाच्या रुंदीकरणास प्रारंभ झाला असून हे काम संथगतीने होत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारा करणे गरजेचे आहे गटारा अभावी रस्त्याच्या दोन्ही बाजूस पाणी साचत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे शहरातील मुख्य रस्त्यावर बसस्थानक शिवाजी चौक 33 केव्ही सबस्टेशन ते तांबाळा मोड पर्यंतच्या मार्गावरील अतिक्रमणात वाढ झाली असून या मार्गावर वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Comments
Post a Comment