आश्रमशाळेत प्रवेश आनंदउत्सव साजरा
निलंगा येथील आश्रमशाळेत प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा.
-++--+++++-----++++++++
निलंगा:- श्रमिक विकास संस्था निलंगा द्वारा संचलित वेणुताई यशवंतराव चव्हाण प्राथमिक व प्रतिभाताई पवार माध्यमिक आश्रम शाळा निलंगा येथे शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी शाळेच्या पहिल्या दिनाच्या औचित्याने नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक यांनी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून विद्यार्थी प्रवेशाचा आनंदोत्सव साजरा केला. संस्था अध्यक्ष विलास माने, सचिव विकास माने, कोषाध्यक्ष आशाताई जाधव, माजी नगरसेविका कलावतीताई माने, मुख्याध्यापक श्रीमती एस.टी. पंडित, मुख्याध्यापक विष्णुकांत गणेशवाडे, परिवेक्षक दशरथ जाधव, जेष्ठ शिक्षक शेषेराव मंमाळे, शिवराज आष्टुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे मुख्य प्रवेशद्वार व शाळेच्या परिसराचे रंग रंगोटी करून फुग्याने व फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले होते. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वाटर बॉटल, वह्या, पेन व नवीन पाठ्यपुस्तके यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना संस्थाध्यक्ष विलास माने म्हणाले गरजू, गोरगरीब ,वंचित, उपेक्षित, भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आश्रम शाळा कटिबद्ध असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या अभ्यासक्रमासोबत शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना गोड खाऊचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमती एस.टी. पंडित यांनी केले. सूत्रसंचालन अजय पाटील यांनी तर आभार बी टी पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment