वाढदिवस अभय दादांचा..! निलंगा विधानसभेच्या भविष्याचा...!
वाढदिवस माझ्या अभय दादांचा..! वाढदिवस माझ्या निलंगा विधानसभेच्या भविष्याचा..!
सामाजिक क्षेत्रापासुन सुरु झालेला प्रवास आज खुप मोठ्या वळणावर आलाय. अनेक चढ उतार या काळात आपण पाहिले, राजकीय यश-अपयश हसत-खेळत पचवले, स्वतःच्या कर्तृत्वावर राजकारणातील एक एक पायरी वर चढत जाणारे लातूर काँग्रेसची बुलंद तोफ, युवा नेते म्हणून आज आपली ओळख झाली आहे. आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या बळावर निलंगा विधानसभेला दिशा देणारी धोरणे आखून त्याचा लाभ सामान्य नागरिकांना मिळावा यासाठी प्रयत्नशील राहिलात.
गेल्या 30/35 वर्षात अनेक संकट आले त्यात ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, एवढंचं काय कोरोना महामारीच्या जागतिक संकटाला निलंगा विधानसभेतील प्रशासनाला हाती धरून समर्थपणे तोंड ही दिलं, हे शक्य झालं ते फक्त आणि फक्त तुमच्यातल्या धीरोदात्त व्यक्तित्वामुळेचं__!
आज तुमचे कार्यकर्ते म्हणुन समाजात वावरत असताना, लोकांच्या मनात तुमच्या विषयी असलेली आत्मियता,प्रेम, कुतुहल, सारं काही भरभरुन पाहायला मिळतं_!
पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी, MSEB तील शेतकऱ्यांची आडवणूक, प्रशासकीय कामे, गावातील तंटे, भावकीतील वाद, MIDC तील प्रश्न, कामगारांची वेतन वाढ, विद्यार्थ्यांचे प्रश्न, जिल्ह्यातील 70 टक्के व बाहेरील 30 टक्के विद्यार्थी असा महाविद्यालयीन ऍडमिशन कोटा असा निर्णय महाराष्ट्र सरकारला घ्यायला भाग पाडणे, सलग जवळपास वीस वर्ष गव्हर्मेंट MBBS ची फी 40 हजारच ठेवणे, जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी महापुरुषांची स्मारक व्हावी यासाठी सफल प्रयत्न, जिल्ह्यातील उसाचा भाव टनाला 1800 पासून 2250 पर्यंत पोहोचवण्यासाठी केलेली आंदोलने व जिल्ह्यातील प्रत्यक्ष ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खिशात प्रत्येक टनाला 400 ते 500 रुपये ज्यादा भाव 2012/13 पासून मिळणे, शेतकऱ्याला पाहिजेल तिथे एका फोन वरती डीपी मिळून देणे
जवळचा लांबचा मतदारसंघातला असा कुठलाही विचार न करता जरी एखाद्याचा मोबाईल मध्ये नंबर फीड नसेल अन्नोन नंबर असेल तरीही त्याचे कसलेही काम असो दवाखान्याचे बिल कमी करणे, दवाखान्यात व्यवस्थित उपचार मिळवून देणे पासून असे अनेक सर्व कामे केलात गेल्या 30/35 वर्षात आपण सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी गोरगरिबी मायबाप जनतेसाठी केलेल्या कामाची तर खरंच गणती नाही वैयक्तिक स्तरावर तुमचे प्रामाणिक प्रयत्न, लोकांसाठीची तळमळ आम्ही सतत पाहतोय इतक्या कठिण प्रसंगातही सुहास्यवदनाने परिस्थितीला सामोरं जाताना, तुम्ही कार्यकर्त्यांसमोर नेहमीचं चांगले आदर्श ठेवत आलात आणि म्हणुनचं तुमचे कार्यकर्ते म्हणुन नेहमीच आम्हांला या गोष्टीचा अभिमान आहे आणि राहणार_!
राजकीय क्षेत्रातलं तुमचं कार्य तर तुमच्या पदार्पणापासुनचं उज्ज्वल आहे. यशाची एकेक पायरी आपण तितक्याचं दिमाखानं पादाक्रांत करत गेलात आणि तुमची ही घोडदौड प्रदेश सचिव टप्प्यापर्यंत येऊन पोहोचली यथावकाश आपण आमदारकीला गवसणी घालाल, यात आम्हांला तिळमात्र ही शंका नाही कार्यसम्राट ही पदवी आपण आपल्या कार्यकतृत्वाने मिळवलीत म्हणूनच कर्तृत्वाचा महामेरू असणाऱ्या या निलंगा विधानसभेचा नेतृत्वाकडून लातूर जिल्ह्य़ातील जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. केवळ निलंगाच नव्हे तर संपूर्ण लातूर जिल्ह्य़ातील जनता भावी नाहीतर आता दमदार आणि 2024 ला फिक्स होणारे आमदार म्हणून आपल्याकडे पाहत आहे. त्या दिशेने आपली दमदार वाटचाल ही सुरू आहे. जिल्ह्य़ातील जनतेचे हे स्वप्न आई तुळजाभवानीचा कृपेने लवकरात लवकर पूर्ण होवो,याच शुभेच्छा!
अशा या कर्तृत्ववान, दृष्ट्या व भविष्याचा वेध घेणाऱ्या नेतृत्वाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!
अभय दादा आपणाला या वाढदिवशी निरोगी दिर्घायुष्य, चिरंतन प्रतिष्ठा, मान, सन्मान, यश, किर्ती लाभो हीचं पंढरीच्या विठ्ठलाकडे प्रार्थना...!
अभय दादा आपण आम्हां कार्यकर्त्यांसाठी तुम्ही कालही सर्वस्व होतात, आजही आहात आणि कायमचं राहणार
अमोल संजय शिंदे
Comments
Post a Comment