राजकुमार.सोनी महेश सेवा पुरस्काराने सन्मानित..

पत्रकार राजकुमार सोनी यांना जिल्हास्तरीय महेश सेवा पुरस्कार 

लातूर/प्रतिनिधी :- निलंगा तालुक्यातील निटूर येथील पत्रकार राजकुमार हारिकिशन सोनी यांनी पत्रकार, सामाजिक, राजकीय, धार्मिक सेवेच्या माध्यमातून काम केल्याने राज्यस्तरीय माहेश्वरी समाजाने त्यांना जिल्हास्तरीय महेश सेवा पुरस्कार हा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल देवून सत्कार करण्यात आला.
        पत्रकार राजकुमार सोनी यांनी पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना सांगितले, माहेश्वरी समाजाने मला दिलेला पुरस्कार हा ऊर्जा प्राप्त असल्याने यापुढेही समाजासाठी दिशादर्शक उपक्रम सादर करणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी लातूर, निलंगा, निटूर येथील माहेश्वरी समाजातील व मित्र परिवाराच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. यात जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर,पत्रकार मिलिंद कांबळे ,पत्रकार परमेश्वर शिंदे, विजयकुमार देशमुख, एस.आर.काळे, प्रशांत साळुंके, संगमेश्वर करंजे, के.वाय.पटवेकर, रविकिरण पिंड, रमेश शिंदे, माधव शिंदे आदी जणांचा समावेश आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..