कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यास तत्काळ निलंबित करा : प्रा. अण्णासाहेब मिरगाळे
निलंगा ,दि २०
निलंगा तालुक्यातील मौजे. नणंद येथील स्मशानभूमीवर अतिक्रमण केलेल्या प्रकरणाबाबत तहसील कार्यालयाच्या माध्यमातून मोजणीचे पत्र काढून दहा दिवस झाले असून अद्याप पर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी,अर्जदार तथा भुमिअभिलेख कार्यालयास पत्र दिले नाही. पत्र देण्यास दहा दिवसाचा विलंब का केला? संबंधित कर्मचाऱ्याने कार्यात कसूर केल्याबद्दल निलंबित का करू नये? म्हणून कार्यात कसूर केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करावे असे निवेदनाद्वारे युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे यांनी तहसीलदारास मागणी केली आहे.
Comments
Post a Comment