वन विभागात अनागोंदी कारभार चौकशी करण्याची मागणी...

वन विभागात अनागोंदी कारभार रोजंदारीवर सात मजूर करतात बारा मजुरांची कामे चौकशीची मागणी..

लातूर,दि.०२(मिलिंद कांबळे)

निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा  येथील शिवारात एका नर्सरीवर सात मजूर हजर तर पाच मजूर गैरहजर असल्याचे दिसून आले. येथील हजेरी पत्रकारानुसार पाच मजूर गैरहजर असल्याने या गैरप्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
 
कासार शिरसी येथील काही पर्यावरण प्रेमी व पत्रकार बांधवांनी कासार बालकुंदा येथील वन विभागास भेट देऊन पाहणी केली असता कामाच्या हजेरी पत्रकावर बारा मजुरांची नावे दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात मात्र पाच मजूरच महिला बारा मजुरांचे काम रणरणत्या उन्हात करत असल्याचे दिसले कासार शिरशी भागात कासार बालकुंदा ममदापूर तांबाळा भागात वन विभागामार्फत विविध वृक्षांचे रोप तयार करणे पिशव्या भरणे नर्सरीत रोपांना पाणी देणे अशी कामे केली जातात यासाठी प्रत्येक मजूरदार महिलेला 292 रुपये ची मजुरी मिळते या अंतर्गत ठिकठिकाणीच्या रोपवाटिकेत वन्य पशु पक्षांना पाण्यासाठी पानवठे ठेवणे जरुरीचे आहे पण कोठेही वन्य प्राण्यांसाठी पाणवठे दिसून आले नाहीत याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे सध्या सर्वत्र उष्णतेची लाट असून पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्य प्राण्यासाठी त्वरित पानवठे उभारावेत ठिकठिकाणी होत असलेल्या गैरकारभाराची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींच्या वतीने करण्यात आली आहे..

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..