जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासारशिरसी येथे वृक्षारोपण...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासारसिरसी येथे सेवाभावी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण...
कासारसिरसी (शाम मुळजकर)
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कासारसिरसी येथील ज्ञान संस्कार बहुउद्देशीय सेवाभावी केंद्राच्या वतीने परिसरात विविध वृक्षांची लागवड करत विद्यार्थ्यांना वृक्ष लागवड व संवर्धनाची शपथ देण्यात आली.
कासार सिरसी येथील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने जागर पर्यावरण संवर्धनाचा हा अभिनव उपक्रम कोल्हापूर येथील सोन्या चांदीचे प्रसिद्ध व्यापारी संवेद गाट यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अनेक व्यापाऱ्यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
या मोहिमेआंतर्गत परिसरात 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली येथील व्यापारी आर एस बोळशेट्टे महेश होळकुंदे प्रमोद वेल्हाळ विशाल देशमाने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे आजी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येत हजर होते केवळ वृक्षारोपण न करता प्रत्यक्ष त्या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत येथील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यापारी आरएस बोळशेट्टे यांनी व्यक्त केले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनंत महामुनी उपाध्यक्ष लक्ष्मीकांत नदीवाढे प्रशांत स्वामी सहशिक्षक प्रेमनाथ रोहिले सचिन बंडगर यांचे सह आजी व माजी विद्यार्थी हजर होते.
Comments
Post a Comment