उमेदच्या महिला करणार पाच हजार वृक्षाची लागवड
उमेद अंतर्गत निलंगा पंचायत समिती आवारात पाच हजार बचत गटाच्या महिला करणार पाच हजार वृक्ष लागवड...
लातूर, दि.०७
लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या आदेशानुसार जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकीले यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार बॕग तयार करण्यात आल्या असून त्याची लागवड करण्यात येणार आहे.
निलंगा पंचायत समिती अंतर्गत उमेद कार्यालयातील दोनशे ते आडीशे महिला केडर सीआरपी प्रत्येकी पाच वृक्ष या प्रमाणे निलंगा पंचायत समिती कार्यालयात दहा गुंठे जागेत मियावाकी पध्दतीने पाच हजार वृक्षांची लागवड होणार आहे.यात आंबा,चिकू,चिंच,जांभळ,पेरू,वड इत्यादी वृक्षांच्या बिया टोबन करून पाच हजार बॕग तयार करण्यात आल्या आहेत.बचत गटाच्या आडीशे महिलानी या मोहिमेत भाग घेऊन पाच हजार बॕग वृक्ष लागवडीसाठी तयार केल्या आहेत.
कृषी अधिकारी कुटवाड व विस्तार अधिकारी संजय आडे यानी या वृक्ष लागवड मोहिमेसाठी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment