शिक्षक सत्यवान पात्रे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न..
शिक्षक सत्यवान पात्रे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न...
निलंगा, दि.०१
दिनांक ०१ जुलै २०२४ वार - सोमवार रोजी केंद्र -सावरी येथे जि प प्रा शा झोपडपट्टी (सावरी ) येथील शैक्षणिक कार्याची धडपड असणारा , हस्तकला, कार्यानुभव व शैक्षणिक साहित्य निर्मितीचा कलाकार असलेला पडद्यामागचा गुणवान शिक्षक सत्यवान पात्रे सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला.
या सेवापूर्ती सोहळ्यासाठी निलंगा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुरेशजी गायकवाड तालुक्याचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा अधिक्षक शा पो आ व गट समन्वयक श्री संतोषजी स्वामी विस्ताराधिकारी श्री गणेशजी दाडगे केंद्रप्रमुख श्री तेलंग , केंद्रप्रमुख श्री शिवाजी शिंदे , शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुणजी सोळुंके ,शिक्षक संघाचे राज्यनेते श्री ज्ञानदेव गुंडुरे ,शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष श्री संजय कदम , शिक्षक पतसंस्थेचे खजिनदार प्रकाश सराटे, साधन व्यक्ती श्री हलकरे,श्री देशमुख ,श्री डोईजोडे , सावरी केंद्राचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री शिवाजीराव जाधव पत्रकार श्री मोहन क्षीरसागर व श्री मिलिंद कांबळे ,सावरी केंद्रांतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनी तसेच होसूर केंद्रातील मुख्याध्यापक श्री गोस्वामी साहेब , हंचनाळ चे मुअ उमाटे सर, शिक्षक बांधव व श्री सत्यवान पात्रे सर यांचे इष्टमित्र परिवार, नातलग उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी सत्यवान पात्रे सर यांच्या अंगी असलेल्या अनेक चांगल्या बाबी, परिस्थिती गरीब असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केलेल्या कार्याची यशोगाथा, त्यांच्या शैक्षणिक कार्यावर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सदाबहार सूत्रसंचालन श्री महेश पाटील यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सावरी केंद्राचे मुख्याध्यापक, शिक्षक बांधवांनी खूप परिश्रम करून कार्यक्रम अतिशय सुंदर व देखणा घडवून आणला.
याप्रसंगी श्री सत्यवान पात्रे सरांनी माझ्यासारख्या गरीब शिक्षकांसाठी तालुक्याची गट शिक्षणाधिकारी साहेबासह ,जेष्ठ विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, संघटनेचे मोठ -मोठे नेते उपस्थित राहून माझा सेवापूर्ती सोहळा साजरा करून माझा यथोचित गौरव केलात... या सारखी दुसरी पर्वणी नाही व हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.
Comments
Post a Comment