वधुपित्याकडून आंब्याचे फळरोप भेट देऊन मुलीचा विवाह समारंभ संपन्न...

वधूपित्याकडून आंब्याचे फळरोप भेट  देऊन  मुलीचा विवाह समारंभ संपन्न...

निलंगा, दि.०९(मोहन क्षिरसागर)

तब्बल एक हजार आंब्याचे फळरोप विवाह समारंभास येणाऱ्या  प्रत्येक पाहुण्यांना भेट देऊन  एक आगळा वेगळा पर्यावरण पूरक विवाह समारंभ अगदी थाटामाटात संपन्न झाला.

‘विवाह’ हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण.हा क्षण आपल्या आयुष्याच्या संध्याकाळीही लक्षात राहावा, यासाठी विवाह सोहळ्यात अनोखे प्रयोग केले जातात.

सामाजिक संदेश देऊन विवाह सोहळा अविस्मरणीय केला जाताना हल्ली मोठ्या प्रमाणत  दिसत आहेत. असाच एक आगळा वेगळा विवाह समारंभ नुकताच संपन्न झाला आहे.

पोटच्या गोळ्याला तळहातातल्या  फोडाप्रमाणे  जपणाऱ्या  वधूपित्याने  पर्यावर्णावर प्रेम व्यक्त करत आपल्या लाडक्या कन्येच्या विवाहात वऱ्हाडी मंडळींना आंब्याचे  एक हजार रोप भेट स्वरूपात  दिले आहे.

लोक हातात एक आंब्याचे फळझाड घेऊन उभे होते. हे दृश्य काही एखाद्या नर्सरीमधील नाही, अथवा कृषीप्रदर्शनीमधील नाही, हे दृश्य आहे एका विवाह सोहळ्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व झाडाचे महत्त्व लोकांना कळावे, म्हणून वधूपित्याने आपल्या कन्येच्या लग्नात एक हजार आंब्याचे फळझाडे लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना भेट दिले.

किल्लारी तालुका औसा जिल्हा लातूर येथील केदारनाथ मंगल कार्यालयात पर्यावरण समतोल राखणे व झाडे लावा झाडे जगवा, हा संदेश देणारा विवाह सोहळा पार पडला.

मौजे  हात्तरगा (हा) ता.निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेले सामाजिक कार्याची आवड असणारे मनोज सूर्यकांतराव इंगळे यांची कन्या सोनाली इंगळे  हिचा विवाह आशिष मुळजे रा.बोरी मातोळा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव(उस्मानाबाद) यांच्यासोबत मंगळवार दि.०९  जुलै २०२४ रोजी पार पडला. 

हा विवाह सोहळा कायमचा लक्षात राहावा यासाठी वधूपिता मनोज इंगळे यांनी झाडे लावा झाडे जगवा हा संदेश विवाहात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीपर्यंत पोहोचवला. तब्बल एक हजार आंब्याचे फळरोपे भेट स्वरूपात वाटप करण्यात  आले .यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व नातेवाईक यांची मोठ्या प्रमाणात  उपस्थिती होती..

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..