हरिजवळगा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप..
हरिजवळगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना बॅग व शैक्षणिक साहित्य वाटप..
निलंगा, दि.१८
मौजे हरिजवळगा ता. निलंगा जिल्हा लातूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅग वाटप करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंडियन ऑयल कॉर्पोरेट च्या वतीने सामाजिक बांधिलकी जपून येथील इयत्ता १ ली ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग हाडोळे,जेष्ठ संपादक मोहन क्षिरसागर शाळेचे मुख्याध्यापक कलबोने बी.एस,पत्रकार मिलिंद कांबळे, ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर हाडोळे,उपाध्यक्ष विनोद मुगळे यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद त्यात श्रीमती वाघमारे सी.पी,श्रीमती कोकणे एम.आय,श्रीमती बेळकिरे ए.एच ,श्रीमती पतंगे आर. एच, श्रीमती नाटकरे एस.पी यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते..
Comments
Post a Comment