आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून मुळजकर परिवाराचे सांत्वन...
आमदार अभिमन्यू पवार यांचे कडून मुळजकर कुटुंबीयांचे सांत्वन...
निलंगा,दि.०६
औश्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शनिवार तारीख 6 रोजी येथील जेष्ठ पत्रकार श्याम मुळजकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांचे पुत्र शशांक मुळजकर यांच्या निधनानिमित्त त्यांनी मुळजकर कुटुंबियांचे सांत्वन केले.याप्रसंगी अनेक कार्यकर्ते हजर होते.
सोमलिंगेश्वर विद्यालय कोराळी येथील कर्मचारी व येथील पत्रकार शाम मुळजकर यांचे पुत्र शशांक मुळजकर व 42 वर्ष यांचे शुक्रवार दिनांक ०६ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अनेक मान्यवर व्यापारी व समाज बांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं एक बहीण व वडील असा परिवार आहे कैलासवासी शशांक यांच्या निधना निमित्त येथील सोमलिंगेश्वर विद्यालय व श्री करी बसवेश्वर विद्यालय त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
Comments
Post a Comment