पोलिस उपनिरीक्षक बालाजी काळगे सेवानिवृत्त..
पोलिस उपनिरिक्षक बालाजी काळगे सेवानिवृत्त
३७ वर्षे सेवा पूर्ण
निलंगा, दि.६
बसपूर ता. निलंगा येथील पोलिस उपनिरिक्षक म्हणून ३७ वर्षापासून कार्यरत असलेले बालाजी बळीराम काळगे हे सेवानिवृत्त झाले.
प्रामाणिक सेवा बजावल्याने बहूतांश काळ लातूरमध्येच गेला आहे. पोलिस अधिक्षक सोमय्या मुंडे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
श्री. काळगे यांचे वयाची 58 पुर्ण झाल्याने नियत वयोमानानुसार पोलीस उप निरीक्षक या पदा वरुन निवृत्त झाले आहेत. पोलीस अंमलदार ते पोलीस उपनिरीक्षक एकुण सेवा काळ 37 वर्ष पुर्ण केला आहे.
प्रामाणिक पणे सेवा केल्याने लातूर शहरातच नौकरी पुर्ण झाली. अत्यंत गरीबीमध्ये त्यांनी एम. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण करून पोलीस अमंलदार म्हणुन लातूर पोलीस दलात दाखल झाले होते.
सेवा काळात चांगली कामगिरी केली याबाबत 277 बक्षीस प्राप्त केले आहेत. त्यांचा मोठा मुलगा लातूर पोलीस दलात आहे, मुलगी डॉक्टर असून जावाई एम डी डाॅक्टर तर लहान मुलगा इंजिनीअर आहे.
Comments
Post a Comment