वैजीनाथ वाघमारे सरांचा सेवानिवृत्त सोहळा संपन्न...
वैजीनाथ वाघमारे सरांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न...
निलंगा, दि.०६
मागील अनेक वर्षापासून निलंगा तालुक्यातील जेवरी, नदीहत्तरगा नणंद आदी विविध गावात शिक्षक म्हणून कर्तव्य बजावून शैक्षणिक कार्याची धडपड असणारे मनमिळावू सर्वांना हवे असणारे आयुष्यमान वैजिनाथ हुलाप्पा वाघमारे सर हे प्रदीर्घ सेवा बजावून तब्बल ३१ वर्षानंतर दिनांक ३० जून २०२४ रोजी नणंद येथून सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन येथील विश्वकर्मा सभागृहात दिनांक ०६जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आले होते. या सेवापुर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निलंग्याचे गटशिक्षणाधिकारी श्री सुरेश गायकवाड हे होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा अधिक्षक शा पो आ व गट समन्वयक श्री संतोषजी स्वामी विस्ताराधिकारी श्री गणेशजी दाडगे ,नणंद गावचे सरपंच हरिभाऊ बोळे, जेष्ठ पत्रकार मोहन क्षिरसागर,पत्रकार मिलिंद कांबळे ,केंद्रीय मुख्याध्यापक निलंगाचे रमेशजी कोळसुरे , जि.प. के.प्रा.शाळा निलंगाचे केंद्रप्रमुख पवार डी आर हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांचाळ एन पी यांनी केले तर सूत्रसंचालन सूर्यवंशी एस आर यांनी केले.
याप्रसंगी बहुजन शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मधुकर सोनवणे ,तालुका शिक्षक समितीचे संजय कदम ,वाघमारे सरांचे आवडते मित्र उत्तम शेळके, शि. वि .अधिकारी संतोष स्वामी,शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आनंद जाधव ,त्यांच्या दोन मुली व नातवाने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विविध शिक्षक ,शिक्षक संघटनेचे पदाधिकारी नातेवाईक मित्र परिवार पत्रकार यांची लक्षणीय उपस्थिती होती.
Comments
Post a Comment