निलंग्यातील बलाढ्य व्यापाऱ्या विरोधात पोलिसात 420 चा गुन्हा दाखल...
निलंग्यातील बलाढ्य वापाऱ्या विरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल...
निलंगा, दि.१८
बहुचर्चित असलेल्या डॉ.शिवाजीराव पाटील - निलंगेकर सहकारी साखर कारखाना संचलित ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव दादासाहेब बोत्रे रा. विठ्ठल नगर शिरूर पुणे यांची फसवणूक झाल्याच्या कारणावरून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगा पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्हासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात निलंगा येथील व्यापारी व्यापारी अंबादास सुग्रीव जाधव रा विद्यानगर निलंगा,
प्रकाश सिद्रामअप्पा सोलापूरे दत्तनगर निलंगा,लक्ष्मीकांत रामेश्वर कालिया मार्केट यार्ड लातूर,कविता प्रकाश सोलापुरे दत्तनगर निलंगा,माधव सिद्रामअप्पा गताटे आनंद नगर निलंगा यांच्या विरोधात निलंगा पोलिस ठाण्यात दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा दाखल झाला असून ज्याचा रजिस्टर नंबर ०२७४ भादवी कलम ४२०,४६७,४६८,४७१,४७२ ,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजा करीत आहेत.
फिर्यादी दिलेल्या जवाबात पुढे असे म्हटले आहे की,मी सण २०२२ पासून सदरील साखर कारखाना महाराष्ट्र शासनाकडून भाडे तत्वावर घेऊन तो ओंकार साखर कारखाना या नावाने चालवीत असून सण २०२० -२०२१च्या
काळात निलंगा येथील साखर व्यापारी अंबादास सुग्रीव जाधव यांची ओळख झाली.सुरुवातीला माझे व त्यांचे चांगले मैत्रीचे समंध होते.त्यामुळे आमचे आर्थिक देवाण घेव होत होती.मात्र २०२२ साली निलंगेकर साखर कारखाना भाडे तत्वावर घेतला तेंव्हा अंबादास जाधव यांनी सदर कारखान्यात भागीदार होण्याची इच्छा व्यक्त केली.मात्र कारखाना मला स्वतःला चालवायचा असल्या कारणाने मी त्यांना नकार दिला मात्र भागीदार होण्याची त्यांची तीव्र इच्छा असल्याने त्यांनी पुन्हा एकदा विनंतीं केली तरीही मी त्यांना नकार दिला होता.त्यामुळे ते माझ्यावर तीव्र नाराज होते. ते माझ्यावर तीव्र चिडून मला तू निलंगा येथे साखर कारखाना कसा चालवतो ते पाहतो.शेतकऱ्यांना मी तुझ्या कारखान्याला ऊस देऊ देत नाही अशी त्यांनी माझे विरुद्ध प्रेस कॉन्फरन्स घेवून लोकांमध्ये माझ्या विरोधात गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला.
निलंगेकर साखर कारखाना शासनाकडून भाडेतत्त्वावर घेण्यापूर्वीच माझ्याकडून साखर खरेदी करण्यासाठी अग्रिम रक्कम म्हणून प्रकाश सिद्रामअप्पा सोलापूरे यांनी दिनांक १८ जानेवारी २०२१रोजी आर टी जी एस द्वारे दहा लाख रुपये ओंकार साखर कारखाना प्रा.लि च्या खात्यात जमा केले होते.त्याच प्रमाणे कविता प्रकाश सोलापुरे यांनीही दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी दहा लाख रुपये ओंकार कारखाना प्रा. लि.खात्यावर जमा केले होते.तर माधव सिद्रमप्पा गताटे यांनी १८ जानेवारी २०२१ रोजी दहा लाख रुपये जमा केले होते. तर लक्ष्मीकांत रामेश्वर कालिया यांनी दिनांक १५ मार्च २०२१ रोजी.आर टी जी एस द्वारे छत्तीस लाख रुपये ओंकार कारखाना प्रा. लि.खात्यावर जमा केले होते.
सदर रक्कमेचा व्यवहार मी पूर्ण केला आहे. मात्र पुढे नंतरच्या काळात म्हणजे ०४ मे २०२४ रोजी निलंगा कोर्टाकडून माझ्या नावे नोटीस प्राप्त झाली असून सदर नोटीसीद्वारे वरील नमूद लोकांच्या वतीने अंबादास जाधव यांनी ओंकार साखर कारखान्याच्या खात्यात टाकलेली रक्कम मी त्यांना परत केली नाही ती परत करण्यात यावी म्हणून सदरचे खोटे प्रकरण त्यांनी कोर्टात दाखल केल्याचे माझ्या लक्षात आले.कोर्टातील प्राप्त कागदपत्र मी पाहिल्यानंतर मला समजले की,अंबादास जाधव यांनी ओंकार साखर कारखाना प्रा.लि.या नावाने खोटे दस्ताऐवज ,खोटे लेटर पेड ,दोन रबरी शिक्के बनावट तयार करून माझी व माझ्या कारखान्याचे एका संचालकांची बनावट सही करून तयार करण्यात आलेल्या खोट्या मजकुराच्या आधारावर माझी आर्थिक फसवणूक व्हावी या उद्देशाने मी त्यांना साखर कारखान्याचा भागीदार म्हणून घेतले नाही या द्वेशामुळे त्यांनी माझ्या विरोधात मा.कोर्टात खोटे प्रकरण दाखलं केले आहे.असेही जवाबात म्हटले आहे...
Comments
Post a Comment