निलंगा विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून अभय साळुंके यांच्यासाठी वडेट्टीवार यांचे स्पष्ट संकेत...
निलंगा विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून अभय साळुंके यांच्यासाठी विजय वडेट्टीवार यांच्या कडून स्पष्ट संकेत...
लातूर, दि.१०(प्रतिनिधी)
विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. आघाडी–युतीचा जागा वाटपाचा तिढा जरी नसला तरी इच्छुक आणि त्यांचे समर्थक तयारीला लागलेले आहेत.
निलंगा विधानसभा मतदासंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणारे भाजपातून काँग्रेस पक्षात आलेले अजित माने व वंचित बहुजन आघाडीकडून निलंगा विधानसभा निवडणूक लढविलेले व काँग्रेस पक्षात आलेले डॉ अरविंद भातंब्रे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. तर लातूर जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अमित देशमुख यांचे कट्टर समर्थक अभय साळुंके यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.तर माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे सुपुत्र अशोकराव पाटील-निलंगेकर यांनीही दोनवेळा निलंगा विधानसभा निवडणूक लढवली असली तरी त्यांनीही तिसऱ्यांदा पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
मात्र या सर्वांपैकी काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देणार हे जरी आज समजत नसले तरी येणाऱ्या काळात कुणीतरी एक काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार असणार आहे.हे स्पष्ट आहे.
मात्र १०ऑगस्ट रोजी लातूर येथे काँग्रेस पक्षाचा विभागीय मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यामध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र आपल्या भाषणात अभय साळुंके यांचे स्पष्ट नामोल्लेख करून भावी आमदारकीचे संकेत दिले.यामुळे लातूर जिल्ह्यात राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून लिंगायत समाजातील एका पोटजाती मधून खासदार डॉ.शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिल्याने आता काँग्रेस पक्षाकडून निलंगा विधानसभेसाठी डॉ.अरविंद भातंब्रे या लिंगायत उमेदवारांना उमेदवारी देणे म्हणजे मराठा समाजावर अन्याय केल्यासारखे होईल.यामुळे डॉ.अरविंद भातांब्रे यांना काँग्रस पक्षाकडून खासदार लिंगायत समाजाचा असल्याने लातूर जिल्ह्यात जातीय समीकरण साधण्यासाठी निलंगा विधानसभेसाठी मराठा समाजात उमेदवारी देऊन समतोल राखला जाईल अशी शक्यता नाकारता येणार नाही.
यामुळे डॉ.भातांब्रे यांना उमेदवारी मिळणे दुरापास्त आहे.
तर मागील दोनवेळा विधानसभा निवडणूक लढवलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी वयाची साठी गाठले असले तरी माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉ.शिवाजीराव पाटील- निलंगेकर यांचे ते राजकीय वारस असल्याने काँग्रेस पक्षाच्या एका गटाने त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. मात्र अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या राजकीय वाटचालीस व भवितव्यास ग्रहण लावणारे माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील -निलंगेकर हे त्यांचे पुतणे आहेत.
त्यांनी दिवंगत डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात अशोकराव पाटील -निलंगेकर यांच्या राजकीय वाटचालीवर व भवितव्यावर दादाचे जॅकेट आणि टोपी परिधान करून ती मला माझ्या अजीनी दिली आहे असे आपल्या भाषणात ठणकावून सांगितल्याने अशोकरावांच्या राजकीय वाटचालीत काळेकुट्ट ढग निर्माण झाले आहेत व काळोख निर्माण झाला आहे.
यामुळे आता अशोक बंगल्याकडे असणारी कार्यर्कत्यांची गर्दी कमी होऊन दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या पक्षाच्या विचारांची गादी अभय साळुंके यांनी जिजाऊ चौकातील काँग्रेस भवनात नेहुन ठेवली आहे.त्यामुळे दादा साहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आलोट गर्दी ही जिजाऊ चौकातील काँग्रेस भवनात दिसून येत असल्याने अशोकराव पाटील -निलंगेकर हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवून विजयी होतील का ? व पक्ष त्यांना उमेदवारी देईल का? हा येणारा काळच ठरवेल...
Comments
Post a Comment