नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी निलंगा नगरपालिका उदासीन...
नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी निलंगा नगरपालिका उदासीन...?
निलंगा,दि.२४(मिलिंद कांबळे)
मागील अनेक वर्षापासून शहराच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या दादापिर दर्ग्याच्या उत्तर बाजूस हैदरिया नगर म्हणून एक वस्ती असून या वस्तीत जवळपास पाचशे ते सातशे कुटुंब वास्तव्यास असून अद्याप येथील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी निलंगा नगरपालिका उदासीन असल्याचे चित्र पहावयास मिळत असून येथील नागरिक मरण यातना भोगत असल्याची वास्तविक चित्र समोर येत आहे..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ई.स.१९९३ साली झालेल्या महाप्रलयकारी भुकंपानंतर गाव परिसरातून व शहरातील जवळपास पाचशे ते सातशे गरीब कुटुंब येथे वास्तव्यास आले असून हे परिवार अबालवृद्ध महिला ,बालके यांच्यासह परिवार वास्तव्यास आहेत. मात्र येथील जनतेला मुलभुत सुविधा देण्यासाठी नगरपालिका उदासीन दिसत आहे. जनतेला प्राथमिक मूलभूत सुविधा देणे ही नगरपालिकेची जवाबदारी आहे.मात्र येथील नगरपालिकेनी या नागरिकांकडे व यांच्या सोयी सुविधेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले दिसत आहेत अर्थात टाळाटाळ करीत आहेत.
सद्यस्थितीत पावसाळयाचे दिवस चालू असून या भागात पक्के रस्ते नाहीत,ना पक्क्या गटार नाहीत त्यामुळे या भागातील नागरिकांचे बाथरुमचे ,व संडासचे घाण पाणी रस्त्यातून वाहत असून या घाण वाहत्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्यांचे आरोग्य रामभरोसे असल्याचे चित्र आहे..
शिवाय मोठा पाऊस झाला तर या भागातील रस्ते पूर्ण चिखलमय होत असून अश्या रस्त्याने ये - जा करणे म्हणजे खूपच कसरतीचे असून नागरिकांना मरण यातना भोगाव्या लागत आहेत..
Comments
Post a Comment