निलंगा कृषीउत्त्पन्न बाजार समिती समस्यांच्या विळाख्यात...
निलंगा कृषी उत्त्पन्न बाजार समिती समस्यांच्या विळाख्यात...
रस्त्याची दुरावस्था सबंधीत प्रशासनाचे दुर्लक्ष...
निलंगा,दि३१(मिलिंद कांबळे)
येथील कृषी उत्त्पन्न बाजार समिती अनेक समस्यांच्या विळाख्यात सापडली असून त्यामुळे शेतकरी त्रस्त व्यापारी त्रस्त व जनता त्रस्त असल्याचे चित्र सद्या पहावयास मिळत आहे व जनतेत मोठ्या प्रमणात बोललेही जात आहे.
येथील बाजार समिती आवारातील रस्त्यावर पावसामुळे चिखल व खड्यांचे साम्राज्य वाढल्याने व्यापाऱ्यांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. या चिखलमय झालेल्या रस्त्यावर लवकारात लवकर मुरूम अथवा खडी टाकावी व रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी व्यापारी व शेतकऱ्यांतून होत आहे.
निलंगा शहर हे एक मोठे शहर असून येथील बाजारपेठ ही बऱ्यापैकी आहे.या बजापेठेत अनेक आडत व्यापारी असून येथील आडत बाजारात मालाची आवकही मोठ्या प्रमाणात होत आहे.यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा महसूलही मिळत आहे.
मात्र या आवारात सध्या चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे.त्यामुळे लिलावात व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाची उचल करण्यासाठी वाहने धजावत नसल्याने माल पडून राहत आहे. त्याचप्रमाणे येथे व्यवस्थीत रस्ते नाहीत,मुतारी नाही,शेतकरी भवन नाही जे रस्ते आहेत ते काही रस्तेही ब्लॉक आहेत ,शिवाय या बाजार समितीत अनेकांची निवासस्थाने ही मोठ्या प्रमाणात आहेत.
चिखलाचे साम्राज्य
कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे आवारातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे बाजार आवारात सध्या मोठमोठे खड्डे पडले आहेत.सतत होणाऱ्या पावसाने बाजारातील आवारात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बाजार समिती आवारात खड्डे मोठ्या प्रमाणात असल्याने खरेदी केलेला माल उचलण्यास वाहने धाजवत नसल्याने माल गोडाऊनमध्ये पडून आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
बाजार समिती व्यापाऱ्यांच्या या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहे. बाजार समिती आवारात मुरुम किंवा खडी टाकून खड्डे तात्पुरत्या स्वरुपात बुजवावेत. व्यापाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
दरम्यान, निलंगा बाजार समिती चिखलमय झाल्यामुळे शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी निलंगा परिसरातील शेतकऱ्यांतून होत आहे.
Comments
Post a Comment