कायमस्वरुपी पाणी निचरा उपाययोजना करा...
लातूर शहर पूर्व भाग कृती समितीचे आयुक्तांना निवेदन..
लातूर,दि.२५(मिलिंद कांबळे)
येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावर गेली 5 वर्षापासुन प्रत्येक पावसाळ्यात पावसाचे व गटाराचे पाणी साचून या रस्त्यावर जलाशय सदृश्य परिस्थिती निर्माण होत असून नेहमी पाणी साचून रोडवर खड्डे पडले असल्याने पाण्यात खड्याचा अंदाज येत नसल्याने रोज अपघाच्या घटना घडत आहेत.
या मार्गावर रहदारी करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी, पालक , नागरिकांसह वाहन चालकांना येथून ये जा करण्यासाठी कसरत करावी लागत असून डेंगू सारख्या सदृश रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व रोगराई पसरण्याची भीती नागरिकात निर्माण झाली आहे.
आंबेडकर चौकातील नागरिकांना रोडवर साचलेल्या घान पाण्यापासून येणाऱ्या समस्यांकडे महानगरपालिका लातूर यांचे लक्ष वेधून घेण्याकरिता लातूर शहर पूर्व भाग नागरी कृती समितीच्या वतीने वेळोवेळी अनेक वेळा निवेदने देऊन लोकशाही मार्गाने आंदोलने केली याचा परिणाम म्हणून लातूर शहर महानगरपालिका यांच्या कडून या मार्गावर रोडच्याअंतर्गत पाईपलाईन करण्यात अली पण अद्याप पाणी निचरा होत नसताना लागलीच रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली ती थांबविण्यात यावी...
Comments
Post a Comment