अनुकांपा तत्वावर सेवेत घेण्यासाठी बौद्ध कुटुंबीयांचे आमरण उपोषण..
अनुकंपा तत्वावर सेवेत घेण्यासाठी बौद्ध कुटुंबियाचे आमरण उपोषण..
लातूर, दि.१६(मिलिंद कांबळे)
अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासाठी भारत एज्युकेशन सोसायटी उदगीर समोर मागील दोन दिवसापासून बौद्ध कुटुंबीयांचे अमरण उपोषण चालू आहे.
अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यासाठी गेल्या अकरा वर्षापासून दलित कुटुंबीयांची आंदोलने चालू आहेत भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या संग्राम स्मारक विद्यालयामध्ये मयत मुरलीधर पुंडलिकराव कांबळे हे सेवक या पदावर असताना ऑन ड्युटी त्यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा दिनांक 26 डिसेंबर 2013 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर सेवेत त्यांच्या मुलाला समावून घेण्यासाठी संपदा मुरलीधर कांबळे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे व शिक्षण उपसंचालक लातूर, शिक्षणाधिकारी लातूर यांच्याकडे वारंवार अर्ज करून देखील त्यांच्या मुलाला म्हणजेच अमोल मुरलीधर कांबळे याला अनुकंपा तत्वावर आजपर्यंत सेवेत सामावून घेत नसल्यामुळे दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी पासून भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यालयासमोर संपदा बाई मुरलीधर कांबळे व अमोल मुरलीधर कांबळे या दलित कुटुंबीयांचे आमरण उपोषण चालू आहे..
Comments
Post a Comment