मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी निलंग्यात म. वि.आ.चा रास्ता रोको...
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण...
निलंग्यात म.वि.आ. चा रास्ता रोको...
निलंगा,दि.३०
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता.अगदी मागील वर्षीच डिसेंबर महिन्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते.मात्र अवघ्या ०८ महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
समुद्रातील वादळी वाऱ्यांमुळे पुतळा कोसळला असून या पुतळ्याचे काम नौदलाच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.
त्या निषेधार्थ निलंगा म.वि.आ च्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.३० शुक्रवार रोजी तब्बल तीन तास रास्ता रोको करण्यात आला.यावेळी म.वि.आ चे प्रमुख नेत्यांपैकी अशोकराव पाटील - निलंगेकर,अभय साळुंके,शोभाताई बेंजरगे, अविनाश रेशमे,सुधीर मसलगे,अंबादास जाधव, अजित माने,अजित निंबाळकर,ऍडव्होकेट नारायण सोमवंशी, लक्ष्मण कांबळे,दिलीप ढोबळे,दयानंद चोपणे,मुजीब सौदागर,पंकज शेळके,यांच्यासह अनेक मान्यवरांनी केंद्रातील भाजपा सरकार व महाराष्ट्रातील युती सरकारवर तीव्र शब्दात टिकास्त्र सोडले व निषेध केला.
यावेळी विजयकुमार पाटील,अजित बेळकोने,आबासाहेब पाटील उजेडकर,गंगाधर चव्हाण ,रमेश मदरसे, पद्मसिंह पाटील,यांच्यासह निलंगा ,देवणी शिरूर अनंतपाळ, तालुक्यातील म.वि.आ चे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी म.वि.आ कडून अनेक मागण्या करण्यात आल्या.
त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवरायांच्या राजकोट किल्ला पुतळा प्रकरणी दोषिवर कडक कारवाई करण्यात यावी.पुतळ्याचे उदघाटन करणारे प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी, व मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेची माफी मागावी.
सोयाबिनला प्रती क्विंटल नऊ हजार भाव द्यावा, गतवर्षीचा ७५% पीकविमा तात्काळ देण्यात यावा.निलंगा येथील व्यापारी जाधव सोलापूरे, गताटे ,यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.देशात वाढत असलेल्या बलात्कारी विरोधात कठोर कायदे करण्यात यावेत अश्या मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.
या रास्ता रोको मुळे छत्रपती शिवाजी चौकातील वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने
वाहन चालकांची व पादचाऱ्यांची मात्र मोठी तारांबळ उडाली.
काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निलंगा पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
Comments
Post a Comment