अन् अनर्थ टळला.मसलगा मध्यमप्रकल्प ९२%भरला...
अन् पुढील अनर्थ टळला
मसलगा मध्यमप्रकल्प ९२ % भरला..
निलंगा,दि.३१
सततच्या पावसामुळे निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्प ९२%भरला असून सद्यस्थितीत पावसाचा जोर कायम असल्याने पुन्हा पळापळी होऊ नये.ऐनवेळी कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पिकाचे नुकसान,जनावरांचे नुकसान, शेतकऱ्यांचे कुठलेही नुकसान होऊ नये याकरिता सर्वांनी सतर्क राहून मसलगा मध्यम प्रकल्पामध्ये 85% च्या वरती पाणीसाठा जाऊ नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना सतर्क ठेवावे अन्यथा अचानक पाणी सोडून शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आढळून आल्यास छावा संघटना रस्त्यावर उतरून जाब विचारेल अशी माहिती छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष दासभैय्या साळुंके यांनी आज सकाळी समाज माध्यमातून व्यक्त केल्यामुळे गेंड्याची कातडी पांघरून झोपेत असलेल्या संबधित मसलगा मध्यम प्रकल्पच्या अधिकाऱ्यांना जागे केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
अन्यथा मसलगा मध्यम प्रकल्पातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून मोठा अनर्थ घडला असता. समंधीत अधिकारी सतर्क व्हावेत या दृष्टीने सर्वत्र फेसबुकच्या माध्यमातून व्हाट्स अपच्या माध्यमातून सदरचा प्रकार समाज माध्यमाद्वारे .व्हायरल केल्यामुळे प्रशासनातील वरिष्ठांनी तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले.
मागील चार-पाच वर्षांपूर्वी असाच अनुचित प्रकार घडला होता.त्यावेळी पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्या नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अचानक पाणी सोडल्यामुळे मसलगा येथील नदीच्या कडेच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते म्हशी जनावरे मृत्यूमुखी पडल्या होत्या पाईप वाहून गेले होते पिके वाहून गेले होते. शेतीची माती वाहून गेली व शेतकऱ्यांनी विचारपूस केले असता तेंव्हा शेतकऱ्याच्या विरोधातच खोटे गुन्हे दाखल केले होते.
Comments
Post a Comment