निलंगा तहसील कार्यालयातील दोन अव्वल कारकून कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या..

निलंगा तहसील कार्यालयातील दोन अव्वल कारकून कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या...

निलंगा,दि.२५(मिलिंद कांबळे)

मागील अनेक वर्षापासून निलंगा तहसील कार्यालयात  कार्यरत असलेल्या अव्वल कारकून संवर्गातील दोन कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या  करण्यात आल्या आहेत.
लातूर जिल्हाधिकारी आस्थापना शाखेच्या वतीने  १५ऑगस्ट २०२४(स्वातंत्र्य)  दिनी आदेश निर्गमित करण्यात आला असून ज्याचा जावक. क्रमांक.२०२४/आस्था/कक्ष -१/अ.का./(प्रशासकीय)/कावी - ५३० असा असून आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की,महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनिमायन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ कलम ४(४) मधील तरतुदीनुसार अव्वल कारकून संवर्गातील एच.टी.नाईक अव्वल कारकून (महसूल)तहसील कार्यालय निलंगा या पदावरून शिरूर अनंतपाळ तहसील कार्यालयातील हणमंत मुदामे यांच्या बदलिने रिक्त झालेल्या पदावर नेमनुकीचे आदेश देण्यात आले आहेत तर मानकोसकर ओ.पी.तहसील कार्यालय निलंगा येथून अव्वल कारकून(महसूल)तहसील कार्यालय उदगीर येथील संजय नाईक यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदावर नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत.दिलेल्या आदेशात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, सध्याच्या कार्यरत पदावरून पदस्थापनेच्या पदावर रुजू होण्यासाठी या आदेशानुसार एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे.सदरील आदेश तत्काळ अमंलात येत असून कर्मचाऱ्यांनी पदस्थापनेच्या पदावर तत्काळ रुजू व्हावे.सदरील आदेश हे कार्यमुक्तीचे  आदेश असून सबंधित विभागप्रमुख/तहसीलदार यांनी नव्याने आदेश काढण्याची आवश्यकता नाही.त्याचप्रमाणे आदेशात पुढे असे म्हटले आहे की,संबंधित अव्वल कारकून यांनी कार्यालय प्रमुख आदेशित करतील अशा कर्मचाऱ्यांकडे त्यांचे पदाचा कार्यभार रितसर पदभार यादिसह हस्तांतरित  करावा व त्यांना बदलीने पदस्थापना  दिलेल्या ठिकाणी रुजू होऊन संबधित कार्यालय प्रमुख यांचे मार्फत अनुपालन अवहाल सादर करावा.सर्वसाधारण बदल्याचे आदेश निर्गमित केल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा १९८१ मधील नियमानुसार दिलेल्या पदग्रहण अवधितच बदलीच्या पदावर रुजू न झाल्यास त्यांच्या अनुपस्थीतीचा कालावधी हा - अकार्यदिन म्हणून गणला जाईल त्याचप्रमाणे  महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मधील नियम ३० -(सी) नुसार मूळ कार्यालयाने बदली झालेल्या कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारचे रजेचे अर्ज स्विकारू नयेत.त्याचप्रमाणे  महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक)नियम १९७९ मधील नियम २३ नुसारही  शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे आदेशही पारित करण्यात आले आहेत..
सदर आदेशावर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे,व निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
या आदेशाची निलंगा तहसील कार्यालायाचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी काय अंमलबजावणी करतील याकडे निलंगा वासी लक्ष लागून राहिले आहे...

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..