निलंगा शहराची सुरक्षा रामभरोसे...
निलंगा शहराची सुरक्षा रामभरोसे...
शहरातील २३ सी.सी. टीव्ही कॅमेऱ्या पैकी एकच कॅमेरा चालू...
निलंगा, दि१७(मिलिंद कांबळे)
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निलंगा नगरपालिकेच्या वतीने शहरात बसविण्यात आलेल्या २३ सीसीटीव्ही कॅमेऱ्या पैकी केवळ एकच कॅमेरा चालू असल्यामुळे निलंगा शहरातील नागरिकांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र आता पहावयास मिळत आहे.
स्थानिक आमदार निधीतून ०८ लाख रुपये खर्च करून बसविण्यात आलेल्या व सद्या बंद असलेल्या या कॅमेऱ्यांचे आता उत्तरदायित्व कोणाचे असा प्रश्न जनतेला पडला आहे. यामुळे निलंगेकरांची सुरक्षा मात्र सध्या रामभरोसे आहे.
शहरात कोणीही गैर कायद्याचे वर्तन करू नये जर कोणी गैरवर्तन करीत असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई करण्यास पोलिसांना अधिक मदत होईल. इंग्लंडप्रमाणे शहरात जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत,असा एक मतप्रवाह तयार झाला
मोक्याच्या ठिकाणी लावलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे खून, अपघात, सोनसाखळी, वाहनचोऱ्या, अपहरण, बेपत्ता, गहाळ वस्तू पुन्हा मिळण्यासारख्या अनेक घटनांमध्ये पोलिसांना खूप मोठी मदत झालेली आहे. ही मदत केवळ निलंगा पोलिसांनाच नाही तर कर्नाटक ,आंध्रप्रदेश,तेलंगणा या महाराष्ट्राच्या सीमेवरील अंतर राज्य पोलिसांना पण होणार आहे. या २३ सी सी टीव्ही कॅमेरा द्वारे घडत असलेले घटनांवर पोलीस क्षणोक्षणी संपूर्ण शहरांवर लक्ष ठेवून राहणार आहेत. यामुळे गुन्हा किंवा अपघात घडल्यानंतर काही क्षणांत पोलिसांची मदत या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे होऊ शकते. अशा या बहुपयोगी यंत्रणेची गेली काही महिन्यांपासून पुरती वाताहत झाली आहे.
Comments
Post a Comment