स्वातंत्र्यदिनी शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू...

स्वातंत्र्यदिनी शाळकरी मुलाचा अपघाती मृत्यू...

निलंगा, दि.१५

निलंगा येथील शिवाजी विद्यालयात शिक्षण घेत  असलेल्या १०वर्षीय शाळकरी  विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाच्या सकाळी अपघाती मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. या दुःखद घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे तळीखेड ता निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेला इयत्ता ४ थीच्या वर्गात  शिकणारा विद्यार्थी नरसिंग चंद्रकांत गुत्तेदार वय (१०) वर्षे  या विद्यार्थ्याचा स्वातंत्र्य दिनाच्या प्रभात फेरीसाठी शाळेत येत असताना तळीखेड पाटीवर  रस्ता ओलांडत असताना सकाळी ०७:०० वाजेच्या सुमारास निलंगा येथून औराद (शाहजनी) कडे जाणारा  मालवाहू ट्रक  K.A.39 - 7293  या नंबरच्या मालवाहू ट्रकने  जोराची धडक दिली.

या अपघातात नरसिंग चंद्रकांत गुत्तेदार  व नरसिंग यांचे मामे भाऊ भागवत गणेश शिंदे वय(१५) रा .तळीखेड व मित्र सागर दत्ता पाटील रा.तळीखेड वय (१६)वर्षे हे तिघेही गंभीर जखमी झाले.तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले.रस्त्यावरील  प्रवाश्यानी या तिघांनाही उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे उपचारासाठी दाखल केले.
कर्तव्यावर हजर असलेले डॉ.गणेश पाटील यांनी  व डॉ.पी.टी.साळुंके  डॉ.विशाल पाटील, डॉ पौळकर मॅडम ,डॉ.दिनकर पाटील यांनी  क्षणाचाही विलंब न करता नरसिंग यांच्यावर शर्थीचे उपचार केले.मात्र त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले नाही.अखेर उपचार सुरू असताना  नरसिंग यांची प्राणज्योत मावळली. तर जखमी भागवत शिंदे यांना व सागर पाटील  यांनाही जबर मार लागल्यामुळे पुढील उपचारासाठी लातूरला हलविण्यात आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. मयत नरसिंग यांचे  पी एम करून दुपारी ०३ वाजेच्या सुमारास तळीखेड येथे अतीमसंस्कर करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..