निलंगा तालुक्यातील मुबरकपुर तांडा ते राठोडा तांडा रस्ता झाला चिखलमय...
निलंगा तालुक्यातील मुबारकपुर तांडा ते राठोडा तांडा रस्ता झाला चिखलमय...
स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष...
निलंगा,दि.२९
देश स्वातंत्र्य होऊन ७७ वर्षे उलटून गेले तरीही अद्याप या तांडा वस्तीला ना एस टी बस नाही ना चांगला रस्ता नाही यामुळे येथील जनता त्रस्त झाली आहे..निलंगा शहरापासून जवळच असलेल्या मुबारकपूर तांडा ते राठोडा तांड्याच्या रोडची दयनीय अवस्था झाली असून रस्ता चिखलमय झाला आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या रस्त्याच्या प्रश्नाकडे गेल्या ७७ वर्षात कोणत्याही लोक- प्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नसून याकडे कानाडोळाच करणेच पसंद केल्याचे दिसून येत आहे.
मात्र हेच पुढारी निवडणुका येताच सर्वच पक्षाचे पुढारी मताचा जोगवा मागण्यासाठी तांडा वस्त्यांवरील लोकांच्या दारापर्यंत येतात व मताचा जोगवा मागण्यास मात्र ते विसरत नाहीत. निवडणुका संपल्या की या वस्त्याकडे पुन्हा कोणी फिरकुन पाहत नाहीत.
असे येथील जनतेचे मत आहे.सदरील रस्ता हा दोन तांड्याची भटके विमुक्त लोकांची वस्ती असलेल्या मध्य भागातील दोन किलोमीटरचा रस्ता हा अद्याप कच्चा रस्ता असून येथील तांडा वस्तीवर अद्याप एस.टी. बस गेलीच नाही तर एस.टी. बसमधून प्रवास करण्याचे भाग्य आणखीन किती वर्षे मिळणार नाही.
असा प्रश्न गरीब जनता उपस्थित करीत आहेत.
सदरील रस्त्याचे काम झाले तर राठोडा मार्गे लातूर जाण्यासाठी केवळ ३५ ते ४० किलोमीटरचा प्रवास होणार आहे.व प्रवाश्यांची सोय होणार आहे.
Comments
Post a Comment