लातूर जिल्ह्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट..
लातूर जिल्ह्यात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट...
पत्रकारितेच्या नावाखाली
पेड न्यूजचा धंदा
लातूर,दि.२४(मिलिंद कांबळे)
लातूर जिल्ह्यात सध्या बोगस पत्रकाराने थैमान घातले असून आता पत्रकारितेतही असेच बोगसगिरीचे पीक आले असून ना बातमी लिहायची अक्कल, ना कुठे बातमीदारीचे काम केलेला अनुभव, ना वार्तांकन करण्याची माहिती, ना पत्रकारितेची डिग्री मात्र तरीही स्वतःला थेट संपादक बनवून काही महाभाग लोकांमध्ये जात असून त्यांच्याकडून अक्षरशः बातमीदारीची लक्तरे काढली जात आहेत. अशाच या युट्यूबच्या आहारी गेलेल्या बोगस संपादक आणि त्यांच्या बोगस पत्रकारांचा आज भांडाफोड होणे ही काळाची गरज बनली आहे.
प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यालयात तसेच कालपर्यंत राजकारणात या त्या नेत्यांमागे धावणारे, गुटखा, मटका व्यवसाय करणारे, मारामाऱ्या, दादागिरी, फालतुगिरी करणारे आज अचानक प्रेस आयकार्ड गळ्यात घालून मिरवू लागल्याने नागरिकांमध्ये पत्रकारिता आणि तीच्या खऱ्या आणि खोट्या पत्रकारांविषयी कमालीची लातूर जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. मात्र हे प्रेस आयकार्ड अधिकृत आहे की अनधिकृत याची माहिती ते नागरिकांपासून लपवत असल्याचे आता दिसत आहे.
बोगसगिरीचा फंडा असा आहे.. अगोदर हे महाभाग एखादे वेबपोर्टल अथवा युट्यूब चॅनेल काढतात. मग त्या पोर्टल, चॅनेलला मनाला वाटेल ते नाव देतात आणि न्यूजच्या नावाखाली बूम तयार करून स्वतःच स्वयंघोषित संपादक होऊन गळ्यात प्रेस आयकार्ड लटकवतात असा काहीसा प्रकार पहायला मिळतो. हे सोशल मिडियावर अचकट विचकट कमेंट करून शिव्या खाल्लेले महाभागनंतर प्रेसच्या नावाने गावोगावी फिरून पेरलेल्या लोकांच्या मुलाखती घेऊन उमेदवाराचा प्रचार करण्यास सुरुवात करत असल्याचा बोगस पत्रकारितेचा फंडा उदयास आला आहे. ना भारत सरकारकडून न्यूज देण्याची कोणती परवानगीचे लायसन, ना RNI चे बातम्या छापण्याचे रजिस्ट्रेशन मात्र तरीही या बोगस महाभागांकडून अनधिकृतरीत्या न्यूज नाव दिलेले फेक प्रेस आयकार्ड छापून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम सध्या सुरु आहे. जश्या पावसाळ्यात छत्र्या उगवतात तश्या निवडणुका आल्या की डझनभर स्वयंघोषित संपादक, स्वयंघोषित पत्रकार उगवल्याचे दिसतात. कारण अधिकृत पत्रकारिता करणे वाटते तितके सोपे नाही. अधिकृत पत्रकारिता करत असताना भारत सरकारच्या, एम आय बी, पी आय बी, पी आर बी , आर एन आय च्या मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे लागते. तुमची प्रत्येक बातमी ही छापील किंवा प्रसारित स्वरूपात वरील शाखांना द्यावी लागते. त्यावर अनेकवेळा विलंबाचा दंड, आचारसंहिता आणि विविध टर्म अँड कंडिशन मधून जावे लागते आणि हे करण्यासाठी संपूर्ण वेळ पत्रकारितेला देणे, वाहून घेणे गरजेचे असते. मात्र हेच स्वयंघोषित संपादक, बोगस पत्रकार यातील काहीच करताना दिसत नाहीत कारण त्यांना अधिकृत मान्यताच नसते आणि त्यामुळे ते सोशल मिडिया प्रमाणे हे सर्व करत असतात आणि त्यांना प्रेस चा दर्जा प्राप्त नसतो. निवडणूक काळात अचानक उगवणारे हेच महाभाग मधल्या काळात कुठे गायब असतात. त्यांच्याकडून आजूबाजूच्या घडामोडी का मांडल्या जात नाहीत आणि नागरिकांचे दररोजचे जे महत्वाचे प्रश्न असतात त्यावेळी हे बोगस महाभाग नेमक्या कोणत्या बिळात लपलेले असतात असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक अधिकृतरित्या काम करणाऱ्या पत्रकारांना विचारत आहेत.याशिवाय पत्रकार परिषदेत बातम्यांसाठी तथाकथित भुरटे पत्रकार हजार ते पाचशे रुपये घेऊन आपली दिवसभराची भूक भागवत असतात काही भुरट्यांनी राजकीय पक्षाच्या कार्यालयात दिवसभर मुक्काम करून पाचशे ते एक हजार रूपये हजेरी मिळत असल्याची कुजबुज जनमानसांत आहे . काही महाभाग मटक्याच्या अड्ड्यांवर हजेरी लावून दोनशे ते पाचशे रुपये उकळत असल्याचे एका नागरिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली आहे
तक्रार करा बोगसगिरीला आळा बसेल..
मात्र अशा महाभागांच्या विरोधात कुणी तक्रार दाखल करत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत जाऊन ते या बोगसगिरीने नागरिकांना ब्लॅकमेल करणे, फसवणे, खंडणी उकळणे असले प्रताप करत आहेत. अश्या महाभागांवर नागरिकांनी वेळीच पुढे येऊन तक्रारी दाखल केल्यास हे निवडणुकीत उगवून स्वतःचे ज्ञान पाजळणारे कुठल्या कुठे गायब होतील हे सांगता येत नाही.
फक्त टायटल घेतले मात्र रजिस्ट्रेशन केले नाही अशी वृत्तपत्रेही छापत आहेत बातम्या टायटल आले त्याचे रजिस्ट्रेशन मात्र केले नाही आणि ते ब्लॉकही झाले तरी त्या वृत्तपत्राच्या नावाने बातम्या सुरूच असल्याचा प्रकार पहायला मिळत आहे.
काही ठिकाणी तर असेही पहायला मिळत आहे की, RNI ला पेपर रजिस्टर करायला पाठवला त्यानंतर अनेक किचकट प्रोसेस मधून जाऊन टायटल आले. टायटल आल्यानंतर मात्र रजिस्ट्रेशन झाले नाही तरीही त्या वृत्तपत्राच्या बातम्यांचे कटिंग तयार करून त्या सोशल मिडीयावर फिरविल्या जातात मात्र जर त्या टायटलचे रजिस्ट्रेशनच झाले नाही, टायटल डिब्लॉक झाले तर मग वृत्तपत्रासारख्या कटिंग तयार करून ब्लॉक झालेल्या टायटलच्या नावाने चालवणे हाही गुन्हा आहे. त्यामुळे यापुढे जर कुणाचे वृत्तपत्र डीब्लॉक करण्यात आले असेल आणि तरीही ती व्यक्ती त्या नावाने वृत्तपत्र कटिंग तयार करून ती व्हायरल करत असेल तर त्या व्यक्तीची तक्रार RNI आणि पोलीस ठाण्यात करण्यात येणार असल्याचे काही संपादकांनी म्हटले आहे त्यामुळे बोगस तर दूरच जे अगोदर वृत्तपत्र क्षेत्रात होते मात्र त्यांची वृत्तपत्रे डिब्लॉक करण्यात आली तरीही ते वृत्तपत्र छापत असतील किंवा त्याच्या कटिंग तयार करून फिरवत असतील त्यांनाही आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
रिक्षाचालक, शिक्षक वकील,ढाबाचालक बनलेत पत्रकार
लातूर जिल्ह्यात रिक्षाचालक, शिक्षक, वकील, भंगार गोळा करणारे,काॅम्युटर दुरूस्ती करणारे यासारखे युट्यूबचे गुन्हेगारी क्षेत्रातील भुरटे पत्रकार आयडी गळ्यात घालून मिरवत असून पत्रकार असल्याचा कोणताही अनुभव नाही, शिक्षण नाही तरी हे पत्रकार कसे??? अनेक भुरट्यांनी काम धंदा व नोकरी सोडून पत्रकार बनण्याचे डोहाळे लागले आहे त्यामुळे पत्रकारितेचे पीक आले आहे प्रत्येक गल्ली बोळात दोन ते तीन भुरटे पत्रकार असल्याने काही सेकंदात ब्रेकिंग न्यूज मिळत असल्याने पत्रकारांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.
Comments
Post a Comment