बदलापूर बालिका अत्याचार व महाराष्ट्रात होत असलेल्या महिला अत्याचाराच्या....
बदलापूर बालिका अत्याचार व महाराष्ट्रात होत असलेल्या महिला अत्याचाराचा निलंग्यात तीव्र निषेध...
काळ्या फिती लावून घडलेल्या घटनेचा व राज्य सरकारचा तीव्र निषेध....
निलंगा,दि.२४(मिलिंद कांबळे)
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील लहान बालिका अत्याचार प्रकरण व महाराष्ट्रात होत असलेल्या महिलांवरील अत्याचार प्रकरणी निलंगा येथील महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लावून
तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संबधित आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी यासह अनेक मागण्यांचे निवेदन येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांना देण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडी व सामाजिक संघटनेच्या वतीने प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील - निलंगेकर, प्रदेश सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर मसलगे, शिवसेनेचे हरिभाऊ सगरे, माजी.सभापती अजित माने,यांच्या उपस्थितीत काळ्या फिती लावून घडलेल्या घटनेचा व राज्य सरकारचा तीव्र शब्दात घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले की, सध्याचे सरकार हे कुचकामी सरकार आहे हे राज्य बलात्काराचा अड्डा बनला असून नराधमांना तात्काळ फाशी द्यावी. व या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली तर प्रदेश सचिव अभय साळुंके म्हणाले की,देशात व राज्यात भाजप सरकार जातीय तेढ निर्माण करीत आहे तसेच शिवसेनेचे नेते हरिभाऊ सगरे म्हणाले की,हा महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे हा महाराष्ट्र कोणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कदापि होऊ देणार नाही
यावेळी माजी नगराध्यक्ष हमीद शेख,अशोकराव पाटील मि.मंडळाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोपणे,शहराध्यक्ष अजित नाईकवाडे,राष्ट्रवादी सेलचे जिल्हाध्यक्ष इस्माईल लदाफ,शहराध्यक्ष एफरोज शेख,मा.नगरसेवक अशोक शेठकार,निलंगा वि.युवक अध्यक्ष अमोल सोनकांबळे,युवा सेने तालुकाध्यक्ष प्रशांत वांजरवाडे,कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर,उपाध्यक्ष सोनाजी कदम,मा.सरपंच पंकज शेळके,जिल्हाउपाध्यक्षसुधाकर पाटील,लहुजी सेनेचे गोविंद सुर्यवंशी,शब्दर कादरी,समद टेलर,डिसीसीचे व्यंकटराव शिंदे,अनिल अग्रवाल,उपाध्यक्ष वीरभद्र आग्रे,शरणाप्पा मूळे, रोहनदादा सूरवसे,शुभम कांबळे, बालाजी शिंदें,महेश चिकराळे,शिवाजी चव्हाण,संतोष चव्हाण,गोविंद धुमाळ,तुराब बागवान,गफारभाई लालटेकडे,सोहेल शेख,आवेज शेख,फैसल शेख,मुगळे दाजी,रोहन सुरवसे,शुभम कांबळे,बालाजी ढगे,निजाम शेख,नसीम तांबोळी,शहीद चाऊस,तसेच कॉंग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,महिला कार्यकर्ते,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment