मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी...
मालवण पुतळा प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी.
निलंगा,दि.२९
सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाचे निकृष्ठ दर्जाचे काम करण्याऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार) गटाच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याबाबत अधिक वृत्त असे की,सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काही दिवसापूर्वी दुर्घटनाग्रस्त झाला.हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का असून ही घटना अत्यंत वेदनादायी आहे.
त्यांच्या पुतळयाची उभारणी करतांना अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही. याप्रकरणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाचे निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्यांवर अत्यंत कठोर कार्यवाही करण्यात यावी.तसेच राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारण्यात यावा अशी मागणी निलंगा तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली.
Comments
Post a Comment