एस.टी.बसने वृद्ध प्रवाश्यास चिरडले...
एस.टी.बसने वृद्ध प्रवाश्यास चिरडले उपचारापूर्वीच वृद्धाचा मृत्यू...
निलंगा,दि.३१
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील औराद (शहा) येथे औराद ते हुलसुर एस टी.बसची वाट पाहत उभे असलेल्या ८३ वर्षीय वृद्धास एस टी बसच्या चालकाने निष्काळजीपणाने बस चालवून जोराची धडक दिल्याने ते जमिनीवर कोसळले व ते बसच्या चाकाखाली आल्याने व बस त्यांच्या शरीरावरून गेल्याने त्यांचा जागीच चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.३० शुक्रवारी घडली.
मौजे अनसरवाडा ता.निलंगा येथील रहिवासी असलेले व्यंकट बळीराम कांबळे वय (८३) वर्ष हे औराद बस स्थानकात एस टी बसची वाट पाहत होते. त्यावेळी निलंगा आगाराची एम.एच. २० बी. एल.३८३७ या क्रमांकाच्या बस चालकाने आपल्या ताब्यातील बस स्थानकात लावताना चालकाने बस हयगयीने चालवल्यामुळे शेजारी उभे असलेल्या मयत कांबळे यांच्या पायावरून बस गेल्यामुळे ते चिरडले गेले.
ही बाब तिथे उभे असलेल्या प्रवाशांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ चालकाला थांबवले.चाकाखाली चिरडलेल्या कांबळे यांना बाहेर काढून औराद येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.
मात्र उपचारासाठी घेऊन गेलेल्या कांबळे यांचा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे येथील डॉक्टरांनी घोषित केले. बसस्थानकातच चालकाच्या निष्काळजी पणामुळे वयोवृद्ध नागरिकाचा बळी गेल्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मयताचा मुलगा डिगंबर व्यंकट कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बस चालक शिवराज व्यंकट हत्तरगे रा. हलगरा ता. निलंगा यांच्या विरोधात औराद(शहा) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास औराद पोलीस करीत आहेत.
निलंगा आगाराचे आगार प्रमुख अनिल बिडवे यांनी मयताच्या कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबीयांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
Comments
Post a Comment