उभ्या सोयाबीन पिकात जनावरे चारून नासधूस !
सोयाबीन पिकात जनावरे चारून नासधूस करून ठार मारण्याची धमकी..
गुन्हा दाखल करण्यास निलंगा पोलिसांची टाळाटाळ ...
निलंगा,दि.२३(मिलिंद कांबळे)
उभ्या सोयाबीन पिकात शेळ्या,गायी म्हसी इत्यादी जनावरे सोडून उभे पिक चारून नासधूस करून जनावरे चरण्यास विरोध केला असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार दि.१२ ऑगस्ट २०२४ रोजी घडला असून याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा यांच्याकडे तक्रार दाखल करूनही अद्याप संबंधितावर कारवाई झाली नसल्याचे पीडित बालाजी काळे यांचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे केळगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील बालाजी सिताराम काळे यांच्यासह कांताबाई तानाजी भालके, त्रिवणाबई सिताराम काळे,नारायण सिताराम काळे, वंदनाबाई विठ्ठल अंचुळे,सुग्रीव सिताराम काळे यांच्या नावे केळगाव शिवारात जमीन सर्वे नंबर १५८ मध्ये ०३हेक्टर ४४ आर जमीन असून याच सर्वे नंबर १५८ मधील उर्वरित जमिनीबाबत प्रकरण न्याय प्रविष्ट असून फिर्यादी व इतर सामायिक जमीन कसून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत आहेत.परंतु गावातीलच हरी काळे हे त्यांच्या लोकांकरवी शेतात जनावरे सोडून नासधूस करीत आहेत.त्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे.
यापूर्वीही दिनांक १५ जुलै २०२४ रोजीही असचा प्रकार घडला होता त्यावेळी निलंगा पोलिसात नारायण पंढरी काळे,गुरुनाथ वैजनाथ काळे, नवनाथ वैजनाथ काळे यांच्या विरोधात दिनांक १५/०७/२०२४ रोजी NCR नंबर ०३२२/२४ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम११५(२),३५२,३५१(२)३५१(३),०(५)नुसार गुन्हा नोंद असून पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे..
Comments
Post a Comment