निलंगा तहसील कार्यालय दलालांच्या विळख्यात...
निलंगा तहसील कार्यालय दलालांच्या विळख्यात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष...
निलंगा,दि.०२ (मिलिंद कांबळे)
तहसील कार्यालयात सर्वसामान्य गोरगरीब जनता,युवक विद्यार्थी इत्यादींची महत्वाची कामे होत असतात.म्हणून शेतकरी, शेतमजूर,विधवा,
परित्यक्ता, तसेच अंध व अपंग व्यक्तींना या कार्यालयात नेहमीच काहीना काही कामानिमित्त यावे लागते.परंतु हे कार्यालय दलालांच्या विळख्यात सापडले आहे.त्यामुळे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तहसील कार्यालयामार्फत अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या जात असताना गोरगरीब जनतेला योजनांचा लाभ मिळावा, हा या विविध योजनांमागील उद्देश असतो.शासनाने तळागाळा
तील शेवटच्या घटकाला योजनेचा लाभ मिळावा म्हणून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत.
परंतु निलंगा तहसील कार्यालय हे पांढरपेशा दलालांच्या विळख्यात सापडले आहे.गोरगरीब जनतेला खोटे आमिष दाखवून तुमचे नाव श्रावण बाळ योजनेमध्ये लावतो माझे तहसीलदार साहेबांशी,सेतू सुविधा मॅनेजरशी व तहसील कार्यालयातील साहेबांशी चांगले संबंध आहेत,असे म्हणून हे दलाल सेतू.सुविधा सबंधिताशी संगनमत करून गोरगरीब जनतेची आर्थिक लूट करीत आहेत.यामुळे चांगल्या योजनांचा फायदा गोरगरीब जनतेला होत नसल्याचे दिसत आहे.
जात प्रमाणपत्र,उत्तन्न प्रमाणपत्र,२१ हजाराचे उत्तन्न प्रमाणपत्र,नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, शिधापत्रिका,नाव समाविष्ट करणे,नाव वगळणे, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना यासह अनेक योजना व योजनांसाठी वेगवेगळी शपथपत्र अश्या कामासाठी दलाल ठराविक रक्कम घेत असतात.अश्या दलालापासून गोरगरीब जनतेची लूट थांबविण्यासाठी तहसील प्रशासनाने वेळीच पाऊल उचलून कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी सामान्य जनतेतून होत आहे.
Comments
Post a Comment