बैल पोळा सणावर पावसाचे सावट...

बैल पोळा सणावर पावसाचे सावट..

निलंगा,दि०१(मिलिंद कांबळे) 

गेल्या दोन दिवसांपासून  निलंगा शहर व  परिसरात पावसाची कधी रिमझिम तर कधी संततधार चालू असल्याने पिके बहरायला लागली आहेत.त्यामुळे सध्यातरी  शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला आहे.
मात्र पावसामुळे पोळा  सणाच्या पहिल्या दिवसी खांदेमळणी असते. बैलांना नदी तलावात धुतले जाते.स्वच्छ केले जाते सजवले जाते.या दोन दिवसात बैलांना कोणत्याही  कामाला जुंपले जात नाहीत बैलांना पोटभर वैरण दिली जाते.मात्र या दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे  शेतकऱ्यांच्या सर्जा राजाच्या बैलपोळा सणाला फटका बसल्याचे दिसून येत आहे. पोळा सण जवळ आल्याने शेतकऱ्यांनी ,व्यापाऱ्यांनी निलंगा  येथील भरलेल्या आठवडे बाजारात बैलांना सजविण्यासाठी लागणारे विविध साज आणले आहेत.

निलंगा शहर व तालुक्यात  शेतकरी बैल पोळा  सण  मोठ्या उत्साहात साजरा करतात. बैलांना सजविण्यासाठी बाजारातून विविध नक्षीकाम असलेल्या झालर, गोंडे, घागरमाळ, मोरणी, कासरे, शिंगांना लावण्यासाठी विविध रंगाचे हेंगुळ,पट्ट्या, नाथनसह विविध सजावटीचे साहित्य आठवडे बाजारासारखे दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसले.मात्र काल दि.०१रोजी  बाजारात पावसामुळे  शुकशुकाट दिसून आला. उद्या सोमवारी  पोळा सण असल्याने निलंगा शहर व  जवळपासच्या खेड्या पाड्यातील व परिसरातील.गावांतील शेतकरी  खरेदीसाठी आले मात्र पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे...

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..