विद्यार्थ्यांना एका पायावर उभा राहून करावा लागतो प्रवास...
विद्यार्थांना एका पायावर उभा राहून करावा लागतो प्रवास...
बस वाहकाला सिटवर चढून काढावे लागते तिकीट...
निलंगा,दि.११
दिवसेंदिवस एस टी बस कडे प्रवाश्यांचा वाढता कल शासनाने जाहीर केलेल्या अनेक योजनांची अंमलबजावणी अपुऱ्या मोडकळीस आलेल्या एस टी बसेस ,चालक वाहक कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे अबाल वृध्द प्रवाशी ,महिला प्रवाशी व विद्यार्थी ,विद्यार्थिनी प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणत हाल होत आहेत.फक्त यांचेच हाल नव्हे तर चालक व वाहकाचेही मोठे हाल होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकीकडे ग्रामीण भागात एस.टी.बसेस वेळेवर येत नसल्याचे दिसून येते, ग्रामीण भागातून विद्यार्थी निलंगा शहरात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात येतात.यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.
सकाळी ०६ वाजल्यापासूनच ग्रामीण भागातून निलंगा शहरातील कॉलेज, शाळेमध्ये येण्यासाठी अनेक गावांना एकच एस. टी.बस आहे.या बसला प्रवाश्यांची व विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणत असल्याने अनेकांना दाटीवाटीने,उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे.त्यात विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
त्यामुळे वाहकाला तिकीट काढण्यासाठी दुरापास्त होत आहे.नाविलाजास्तव सीटवर बसलेल्या प्रवाशांच्या सीटच्या वरील भागावर उभे राहून तिकीट काढावे लागते.
असाही प्रकार आता निलंगा आगारातील अनेक बसमध्ये पहावयास मिळत आहे.असे प्रवाश्यातून मोठ्या प्रमाणत चर्चिले जात आहे.तर याबाबतचा व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमावर फिरत आहे.
ग्रामीण भागातून निलंगा शहरात दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी तर हजारो प्रवाशी त्यांच्या वेगवेगळ्या कामानिमित्त व खरेदी विक्री साठी किंवा अन्य कामासाठी निलंगा शहरात येत असतात. हे प्रवाशी एस टी बसनेच प्रवास करण्याचे पसंद करतात.
निलंगा तालुक्याच्या व परिसरातील प्रवास करीत असलेल्या प्रवाश्यांच्या संख्येच्या प्रमाणत पाहायचे झाले तर निलंगा आगारात एस टी बसची संख्या ही ७५ ते ८० च्या आसपास आहे तर निलंगा आगारात १८२ बस चालक असून १६५ ही वाहकांची संख्या आहे.
ही संख्या अत्यंत तोकडी आहे.त्याचप्रमाणे काही बसेसही भंगार आहेत.
वास्तविक पाहता निलंगा आगारात बस,बसचालक,व वाहकांची संख्या ही अधिक असायला हवी आहे.त्याचप्रमाणे एस टी बसची संख्याही कमी असल्याने ग्रामीण भागात अनेक गावाला दिवसभरात एकच बस असते तर काही गावाला अनेक वेळा बस जरी असली तरी त्या बसला प्रवाशी संख्या ही क्षमेतेपेक्षा ज्यास्तच असते. त्यामुळे एस टी बसचे वेळापत्रक कोलमडले असल्याचे चित्र पहावयास. मिळत आहे. गावांना वेळेवर बस येत नाही. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एस टी बस मध्ये प्रवाशांना सीट मिळत नाही त्यातच विद्यार्थ्यांना एका पायावर उभा राहून प्रवास करावा लागत आहे. वाहकाला तर चक्क सीटवर चढूनच प्रवाशांचे तिकीट काढावं लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा सुटल्यानंतर दुपारी विद्यार्थी उपाशीपोटी बसची तासनतास वाट पाहत उभे राहतात. तर कधी बसस्थानकावर थांबलेल्या मुलींना काही रोडरोमियोंच्या छेडछाडीला सामोरे जावे लागते. तर बस उशिरा आल्याने ग्रामीण भागातील रानावनात राहणार्या मुलींना घरी जाण्यास उशीर होतो. सायंकाळी ०४ वाजेच्य सुमारास शाळा सुटल्यानंतर कधी-कधी संध्याकाळपर्यंत बस येत नाहीत. त्यामुळे लहान लहान मुले बसची वाट पहात अंधाऱ्या रात्रीस सुरुवात होते.अशा वेळी पालकांना मुलांना घ्यायला यावे लागते. तर अनेक पालक आपले मुले वेळेत घराकडे येत नसल्यामुळे चिंताग्रस्त होते असतात . त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बसने प्रवास करत असताना एका पायावर उभा राहून प्रवास करावा लागत आहे.
________________
निलंगा व शिरूर अनंतपाळ अशा या दोन तालुक्यासाठी निलंगा आगारात एकूण ८१ बसेस आहेत. ७५ वर्षांतील मोफत प्रवाशांची संख्या जास्त वाढत आहे. त्यामुळे कांही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बस मध्ये उभे राहून प्रवास करावा लागत आहे. शासनाकडून चार्जिंग चे नवीन १६ एसटी बसेस निलंगा आगारासाठी येणार आहेत. ज्या ठिकाणी प्रवाशांची हाल होत आहे त्या ठिकाणी एसटी बस वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असल्याने वाढत्या प्रवाशांची संख्या पाहता निलंगा आगारासाठी ८१ बसेस ऐवजी आणखीन बसेस वाढणे गरजेचे आहे.
अनिल बिडवे, आगर प्रमुख निलंगा
बसच्या वेळा पत्रकानुसार वेळेवर एसटी बसेस सोडल्या जात नाहीत. त्यामुळे येळनूर, गुंजरगा, बोरसुरी, सिंदखेड या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नुकसान होत आहे.
सिद्धेश्वर शिवाजी सोळुंके, येळनूर प्रवाशी
____________________
येथील बस स्थानक चौकशी कक्षात विचारणा केली असता. ते व्यवस्थीत बोलत नाहीत . डेपोत जाऊन विचारा म्हणतात डेपोत गेल्यानंतर चौकशी कक्षात विचारणा करा म्हणून सांगत आहेत. किंवा गाडी नाही म्हणून सांगत आहेत त्यामुळे आम्हा प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसेस चालू असल्यामुळे खाजगी जीपही बंद आहेत.
तुकाराम माधवराव भोसले
Comments
Post a Comment