दैव बलवत्तर म्हणून तो पुढील अपघात टळला..

दैव बलत्वर म्हणून तो अपघात टळला...

ती महिला थोडक्यात बचावली...

निलंगा बसस्थानकातील प्रकार...

निलंगा,दि.०९

आठवडा भरापूर्वी एस.टी बसची वाट पहात उभे  असलेल्या वृद्धास एस टी बस  चालकाच्या  निष्काळजी पणामुळे बस अपघातात  मौजे अनसरवाडा  येथील व्यंकट बळीराम कांबळे वय ८३ वर्ष या  वृद्धाचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज दि.०९ रोजी.दुपारी  निलंगा येथील बसस्थानकात असाच एक मोठा  अपघात होता - होता दैव बलत्वर म्हणून  थोडक्यात टळला.
अशी  चर्चा  निलंगा बस स्थानकात शहरात  दुपारपासून चर्चिली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,मौजे सरवडी  तालुका निलंगा येथील  सुरेखा लक्ष्मण मंन्नाळे वय ४० वर्षे ही प्रवाशी महिला  सरवडी येथून सकाळी ०९ वाजताच्या बसने निलंगा येथे महिला बचत गटाचे नवीन बँक खाते उघडण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आली होती.
आपले काम आटोपून त्या गावी परत जाण्यासाठी निलंगा बसस्थानकात आल्या. काही वेळ बसची वाट पाहिली थोड्याच वेळात निलंगा व्हाया  सरवडी मार्गे किल्लारी जाणारी बस - बस स्थानकात प्लॅटफॉर्म वर लावण्यासाठी येत असताना  सदरील महिलेने   जागा पकडण्यासाठी वाहकाच्या पाठीमागील सीटवर झाडू  टाकून जागा पकडत होती. तेंव्हा बसचा धक्का लागून ती जागेवर कोसळली व दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली.
मात्र निलंगा आगाराची बस क्रमांक एम एच २० बी एल ०६८५ या बसचे चालक बंडगर (२०३३०)यांनी व वाहक जाधव (९१७४) यांनी निष्काळजीपणाने आपल्या ताब्यातील बस चालवली बस चालवत असताना चालकांनी दोन्ही बाजूच्या आरश्यात पाहून बस चालवणे आवश्यक आहे. व बस वाहकाने ही बसकडे लक्ष देणे गरजेचे असते. मात्र तसे झाले नसल्याने दुपारी ०२: ३० वाजेच्या सुमारास सदरील महिला जागा पकडण्यासाठी बस खाली जाता - बालंबाल बचावली दैव बलत्वर म्हणून मोठा अपघात टळला.

मात्र निलंगा बस स्थानकात सदरील प्रकार घडला असताना चालक व वाहक या दोघांनीही या  अपघाताला गांभीर्याने घेतले नाही वा जखमी महिलेला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचे सौदार्य ही  दाखविले नाही. शिवाय सदरील घटनेची माहिती स्थानक प्रमुखांना देणे आवश्यक असताना  त्यांना  तेही गरचेचे वाटले नसावे.
जखमी महिलेस उपस्थित असलेल्या  एका अनोळखी प्रवाश्याने ऑटोने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपजिल्हा रुग्णालयात महिलेवर पुढील उपचार सुरू असून महिलेच्या दोन्ही पायाला गंभीर स्वरूपाची जखम झालेली आहे.

याबाबत पोलिसात जखमी रुग्णाचा अहवाल  बातमी लिहीपर्यंत पाठण्यात येण्याची प्रक्रिया चालू होती.
याबाबत बसस्थनाकात कर्तव्यावर  असलेल्या पोलिसांना  ही घटनेची कल्पना आहे किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..