उपविभागीय अधिकाऱ्याने दिले तात्काळ पंचनाम्याचे आदेश..

उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले तात्काळ पंचनाम्याचे आदेश ....

निलंगा,दि.०८(मिलिंद कांबळे)

तालुक्यातील नणंद  येथील उडीद,मूग व सोयाबीन पिकाच्या  नुकसानीची पाहणी करण्यासाठी नणंद गावी  उपविभागीय अधिकारी  शरद झाडके यांनी भेट दिली. नुकसान पाहून तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले.

 निलंगा तालुक्यातील मौजे नणंद येथील मागील आठ दिवसापासून  संततधार पावसामुळे उडीद ,मूग, सोयाबीन यांचे अतोनात नुकसान झाले असून यासंबंधी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी निलंगा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी  शरद झाडके  यांनी प्रत्यक्षात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून तलाठी, कृषी सहाय्यक यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. उडीद व मूग  या पिकाचे जवळपास 50 ते 60 टक्के नुकसान झालेले असून शासनाकडून नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

शेतीची पाहणी करताना उपविभागीय अधिकारी शरद  झाडके यांच्या सोबत तलाठी ननावरे, कृषी सहाय्यक लासूने, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा.अण्णासाहेब मिरगाळे, शेतकरी सचिन मिरगाळे, हनुमंत  देशमुख, प्रताप मेत्रे, रियाज मुल्ला, राहुल पेटकर, विशाल टोपना, अब्बास मुल्ला, आनंत देशमुख, माधव औंढे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..