अखेर त्या गायीचा मृत्यू...
अखेर भटक्या श्वानांच्या हल्ल्यात त्या गायीचा मृत्यू...
निलंगा,दि.१४
मौजे अनसरवाडा ता. निलंगा जिल्हा लातूर येथील शेतकरी शिवाजी उसनाळे यांच्या गायीचा भटक्या श्र्वांनानी शेपटीचा चावा घेऊन शेपटी तोडल्याचा प्रकार दि.१२ गुरुवारी गावात घडला होता.
दि.१३ रोजी शेतकरी शिवाजी उसनाळे यांनी गायीला चारण्यासाठी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात घेऊन गेले होते. तेथे पत्रा शेडजवळ गायीला बांधून चारा आणण्यासाठी गेले असता पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांनी गायीवर हल्ला केला. व गायीचे लचके तोडले या हल्ल्यात गाय रक्तबंबाळ झाली व यातच गायीचा सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
Comments
Post a Comment