हाणमंतवाडी(हाडोळी) ग्रामपंचायतीला नवीन मतदान बूथ देण्याची मागणी....
हाणमंतवाडी (हाडोळी) ग्रामपंचायतीला नवीन मतदान बूथ देण्याची मागणी...
निलंगा,दि.१४
वाढती मतदार संख्या पाहता तालुक्यातील हाणमंतवाडी हाडोळी व आनंदवाडी (हा) या दोन गावची ग्रुप ग्रामपंचायत असून या दोन्ही गावात एकच निवडणूक बूथ आहे.त्यामुळे दोन्ही गावची मतदान प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने अनेक मतदारांना आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागत आहे.
त्यामुळे कोणत्याही मतदारांनी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी या गावचे लोकनियुक्त सरपंच उमाकांत व्यंकट माचन्ना यांनी तहसीलदार निलंगा यांना निवेदन देऊन ग्रुप ग्रामपंचायतीचे मतदार हे चौदाशे पेक्षा जास्त असल्या कारणाने एकाच बूथवर मतदान प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागत असून पूर्ण मतदान होण्यास रात्रीचे आठ वाजत आहेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेत मतदान प्रक्रिया बंद होत असतात त्यामुळे अनेक मतदारांना मतदानाच्या हक्का पासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे या गावाला नवीन मतदान बूथ देण्याची मागणी करण्यात आलेली आहे.असेही तहसीलदार निलंगा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर सरपंच उमाकांत माचन्ना यांची स्वाक्षरी आहे.
Comments
Post a Comment