देशातल्या प्रत्येक भारतीयांनी संविधानाचे मूल्य जपावे.. डी .के .सूर्यवंशी
देशातल्या प्रत्येक भारतीयांनी संविधानाचे मूल्य जपावे...
- डी.के.सूर्यवंशी
भारत देशातील प्रत्येक नागरिकाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संविधानाचा उपयोग झालेला आहे. व भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला मार्गदर्शक ठरले आहे. त्यामुळे देशातील अखंडता,बंधुता व समता कायम आहे. त्यामुळेच देशाची एकात्मता व अखंडता अबाधित राहिली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी भारतीय संविधानाचे मूल्य जपणे हे प्रत्येक भारतियांचे कर्तव्यच आहे असे प्रतिपादन डी.के.सूर्यवंशी यांनी केले.
दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संविधान मंदिराचे उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा येथील संविधान मंदिराचे उद्घाटन ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. सुनील माने यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी भटक्या विमुक्त जाती व जमाती महाराष्ट्रचे सचिव नरसिंग झरे, डी . के.सूर्यवंशी पत्रकार किशोर सोनकांबळे, प्रशिक्षण संस्थेचे गटनिर्देशक कामराज पांचाळ यांच्या सह कर्मचारी विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने देशातील विखुरलेल्या जात,पंथ ,भाषा,संस्कृती विविधतेने नटलेल्या देशाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून एका धाग्यात गुंफण्याचे उल्लेखनीय कार्य केलेले. त्यामुळेच देशाची अखंडता टिकून राहिली आहे. हे अधोरेखित होते. म्हणून प्रत्येक भारतीयांनी भारतीय संविधानाची मूल्य जपणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.असेही ते यावेळी बोलताना म्हणाले..
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,आपले भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून, याचा अभिमान आपल्या सर्व भारतीयांना असायलाच पाहिजे.
संविधानात सांगितलेली मूल्ये सर्व भारतीय नागरिकांनी जपावीत,' असे प्रतिपादनही त्यांनी केले. 'भारतीय संविधान एवढे महत्त्वाचे का आहे ?' हे सांगताना डी.के. सूर्यवंशी यांनी संविधान पूर्वस्थिती, स्वातंत्र्यानंतर संविधानाची गरज, नागरिकांना मिळालेले हक्क अधिकार आणि नागरिकांचे कर्तव्य याबद्दल माहिती दिली.
प्रत्येक शाळेतून संविधानाविषयी जनजागृती करण्यात यावी. संविधानाच्या उद्देशिकेत संपूर्ण भारतीय राज्यघटनेचा सारांश मांडण्यात आलेला असून, उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, इंटरनेट मोबाईल यांचा वापर विद्यार्थ्यांनी ज्ञान /माहिती मिळवण्यासाठी करावा.व आपल्या आसपास घडणाऱ्या संविधानिक विरोधी घटनांचा विरोध केला पाहिजे.आपल्या हक्क व अधिकार तसेच राष्ट्राप्रती आपले कर्तव्य या विषयी प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. संविधान निर्मितीमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका आणि त्यांच्या भाषणांचे दाखलेही यावेळी व त्यांनी दिले. उपस्थित विद्यार्थी पालक नागरिक तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी या व्याख्यान श्रवण केले.
यानंतर निलंगा येथील संविधान मंदिराचे उद्घाटन फीत कापून अडव्होकेट माने व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेल्या सर्व स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य पांचाळ सरांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्र. प्राचार्य पांचाळ सर जेवळीकर सर, सर्व निदेशक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment