जिजाऊ चौकातील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन....

जिजाऊ चौकातील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्रामदिन  साजरा...

निलंगा,दि.१७

येथील जिजाऊ चौक, निलंगा तसेच कॉंग्रेस कार्यालय, अशोक बंगला निलंगा येथे झेंडावंदन करण्यात आले. या सोहळ्यात पक्षाचे फ्रंटल सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक प्रमुख मंडळी उपस्थित होती. मराठवाड्याच्या ऐतिहासिक लढ्याला आदरांजली अर्पण करत आजच्या दिवशी एकत्र येण्याचा सन्मान आम्हाला लाभला. या कार्यक्रमात देशभक्तीची भावना जागृत झाली आणि राष्ट्राप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या वीर योद्ध्यांना अभिवादन करून त्यांच्या त्यागाची आठवण करून दिली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय दादा साळुंके, तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी सभापती अजितजी माने, माजी नगराध्यक्ष हमीद भाई शेख, जिल्हाध्यक्ष (डॉक्टर सेल) डॉ. अरविंदजी भातंबरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर दाजी पाटील, कार्याध्यक्ष ॲड. नारायण सोमवंशी, लाला पटेल, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, माधवराव पाटील आबा, दत्ताजी देशमुख, चक्रधर शेळके, माजी पं.स सदस्य महेश देशमुख, अमोल सोनकांबळे, गंगाधर चव्हाण, विठ्ठलराव पाटील, प्रमोद कदम, धनाजी चांदुरे, बालाजी शिंदे, रमेशजी मदरसे, डॉ. बलभीमजी सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..