निलंग्याची जनताच दादासाहेबांच्या विचारांची वारस...

निलंग्याची जनताच दादासाहेबांच्या विचाराची वारस- सौ. संगीताताई पाटील निलंगेकर... 

निलंगा,दि.२३

तालुक्यातील डांगेवाडी येथे महिला आघाडीच्या नुतन पदाधिकारी यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना सौ. संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले की मी दादासाहेबांचे कार्य जवळून पाहिले आहे. मतदारसंघाच्या विकासात्मक कामासाठी दादासाहेबांनी स्वताला वाहुन घेतल होत. जनता हीच दादासाहेबांचा परिवार होती. त्यामुळे दादासाहेबांच्या विचाराची वारस ही जनताच आहे. व दादासाहेबांच्या विचाराच प्रतिनिधीत्व हे अशोकराव पाटील निलंगेकर हेच करत असल्याच सांगितले.
      तालुक्यातील डांगेवाडी येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या महिला आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डांगेवाडी येथील व निलंगा पंचायत समिती च्या माजी सभापती चमनबाई हुलसुरे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी, औराद शहाजानी च्या सरपंच आरतीताई भंडारे यांची महीला आघाडीच्या निलंगा तालुकाध्यक्ष पदी, सरचिटणीस पदी रमाताई टोपे, शिरूर अनंतपाळ च्या महानंदा वाघमारे यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी, उदगीर शहराध्यक्षपदी ललीताताई निले, शिरूर अनंतपाळ शहराध्यक्ष पदी करुणा पारशेट्टे व वांजरवांडा गावच्या सरपंच वैशाली जाधव यांच्या निवडी झाल्याबद्दल महिला आघाडीच्या लातूर जिल्हाध्यक्षा शिलाताई पाटील व सौ. संगीताताई पाटील निलंगेकर यांच्या शुभहस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
      यावेळी सौ. संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्यात महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिलाताई पाटील, राखीताई शेळके, आरतीताई भंडारे चमनबाई हुलसुरे, रमाताई टोपे यांनी मनोगत व्यक्त करत निलंगा मतदारसंघातील भगीनीचे लाडके अशोकराव पाटील निलंगेकर व कॉग्रेस च्या पाठीशी खंबीरपणे उभे टाकण्याचे आवाहन केले. यावेळी मोठ्या संख्येने महीलाची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..