निलंगा पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई...
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी निलंगा पोलिसांकडून अनेक वाहनचालकावर कारवाई...
निलंगा, ता.२२
निलंगा शहरातील व मुख्य मार्गावरून बेशिस्त पळणार्या वाहनाना शिस्त लावण्यासाठी निलंगा पोलिस अॕक्टीव्ह मोडवर आले असून स्पेशल ड्राईव्हद्वारे ३५ केसेस करून ३९ हजार रूपयाचा दंड वसूल केला आहे. पोलिस निरिक्षक सुधीर सूर्यवंशी यांच्या धडक कारवाईने वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी डाॕ. नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखली
पोलीस स्टेशन निलंगा अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे निलंगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांचे आदेशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक श्री. पल्लेवाड तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय बिरादार, संदीप कांबळे आदीने विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध मोटार वाहन कायद्याखाली १) विना लायसन्स वाहन चालवणे २) विना सीट बेल्ट वाहन चालवणे ३) विना हेल्मेट मोटार सायकल चालवणे ४) रनिंग मोबाईल ५) फ्रंट शीट बसवून प्रवासी वाहतूक करणे ६) वाहनाचे कागदपत्र जवळ न बाळगणे ७) वाहनावर रजिस्ट्रेशन नंबर न टाकने अशा विविध कलमाखाली ३५ केसेस करून ३९.००० हजार रुपयाचा दंड फोटावला माहे १ सप्टेंबर ते आज पावतो २७६ वाहनावर कार्यवाही करून दोन लाख 52 हजार रुपये दंड आकारले आहेत त्यामुळे वाहनधारकांचे धाबे दणाणले आहेत. आता शहरात चालणाऱ्या विविध अवैध धंदेवाल्यावरही कारवाई केली जाणार असून रात्री आकरा वाजण्याच्या आत हाॕटेल, धाबे, बिअर-बार उघडे ठेवणार्यावही कारवाई केली जाणार आहे.
Comments
Post a Comment