निलंगा शहरात विविध ठिकाणी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनसाजरा...

निलंगा शहरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा..

निलंगा,दि.१७

निलंगा शहरात विविध ठिकाणी  मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हुतात्मा स्मारकात सकाळी ०७:३५ वाजता जेष्ठ नागरिक दत्तोपंत पेठकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तहसील कार्यालयात  ०८:०५ वाजता तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नगर परिषद निलंगा येथे ०८:२० वाजता उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते, पंचायत समिती कार्यालय ०८:३० वाजता गट- विकास अधिकारी सोपान आकेले यांच्या हस्ते तर  उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा येथे ०९:०० वाजता  उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. तर  छत्रपती शिवाजी महाराज चौकात ०९:२५ वाजता  मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीनेही  मानवंदना देण्यात आली.
स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले.१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद राज्य निजामा पासून मुक्त केले गेले. म्हणून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला. यावेळी थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या कामांमुळे आज या दिनाला विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे शहरातील प्रत्येक शाळा कॉलेज,व सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालयात ही ध्वजारोहण करण्यात आले.अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली होती. यावेळी शहरातील  प्रतिष्ठित व जेष्ठ नागरिक, विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..