निलंगा शहरातील विविध समस्या...
निलंगा शहरातील विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी मुख्याधिकाऱ्याना निवेदन...
निलंगा,दि.१२
निलंगा शहरातील विविध भागातील समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी निलंगा यांना काँग्रेस पक्षाचे युवक शहर अध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात व शहरातील नागरिकांच्या वतीने निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,शहरातील हैदरीया नगर ,छत्रपती शिवाजीनगर भागात तत्काळ मुरूम टाकण्यात यावे,औरंगपुरा, जामबाग भागातील कामे तत्काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे शहरातील हैदरिया नगर,छत्रपती शिवाजी नगर तसेच औरंगपुरा भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून अनेक वेळा निवेदने देण्यात आली आंदोलन ही करण्यात आली संपूर्ण पावसाळा संपत आला तरी मुरूम टाकण्यात आले नाही अद्याप पूर्ण मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत म्हणून विविध मागण्या घेऊन संबंधित भागातील नागरिकांनी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी यांच्या दालनात घेराव घालून वरील विविध मागण्याचे निवेदन दिले असून येणाऱ्या आठ दिवसात मागण्या पूर्ण नाही झाल्यास येणाऱ्या 23 सप्टेंबर रोजीपासून निलंगा नगर पालिके समोर बेमुद्दत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सदरील निवेदनावर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब सौदागर,निलोफर नजाद, साजिदा शेख, सुरय्या सय्यद, ताईमिन पटेल, रीहाना पठाण,दिपाली चव्हाण, रीफाना सय्यद,बिस्मिल्लाबी खातून, मुन्नाबी शेख आदी महीलासह
Comments
Post a Comment