तळीखेड जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामस्थांचे व सरकारचेही नुकसानच...
तळीखेड जिल्हा परिषद शाळेकडे ग्रामस्थांचे व सरकारचेही दुर्लक्षच...?
तळीखेड जिल्हा परिषद शाळेला जागा अपुरी विद्यार्थी संख्या मात्र अधिक...
निलंगा,दि.२४
मौजे तळीखेड ता.निलंगा जिल्हा लातूर येथील जिल्हा परिषद शाळेकडे येथील सुज्ञ ग्रामस्थांचे व सरकारचेही दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार येथे पहावयास मिळत आहे.विद्यार्थीसंख्या ज्यास्त व शाळेला जागा अपुरी असल्याचे येथे चित्र आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेत अभ्यासक्रमा बरोबरच विविध स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने चमकत आहेत.शिक्षकांच्या अथक प्रयत्नामुळे येथील शाळेच्या गुणवत्तेचा टक्का वाढत आहे. त्यामुळे प्राविण्य मिळविलेल्या या शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी काही सुज्ञ पालक स्वतःसह इतरांनाही परावृत करीत आहेत.
मात्र या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थीसंख्या जास्त व शाळेसाठी जागा अपुरी असल्याची परिस्थिती पहावयास मिळत आहे. तळीखेड गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून येथील विद्यार्थी संख्या ही (१२४) मुले,मुली मिळून जवळपास सव्वाशेच्या घरात आहे.
या शाळेला एकूण (०७)शिक्षकांची पदे मंजूर आहेत. येथे एकूण (०६) शिक्षक कार्यरत असून एक पद रिक्त आहे.या शाळेला अद्याप मुख्यमंत्री सहाय्यक शिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. अशी परिस्थिती असताना या शाळेला जागा मात्र खूपच अपुरी आहे.
या शाळेला प्रार्थनेसाठी (ग्राउंड) मैदान नाही. विद्यार्थ्याना खेळण्यासाठी मैदान नाही. सदरील शाळा ही पूर्व पश्चिम १०० फूट दक्षिण उत्तर ६२ फूट या क्षेत्रफळात म्हणजेच ६२०० स्केवर फुटाच्या इतक्या कमी जागेत या शाळेचा डोलारा चालत आहे.
⁶या प्रकाराकडे अद्याप ग्रामस्थांनीही लक्ष देऊन प्रयत्न केल्याचे पहावयास अथवा ऐकावयास मिळते नाही. शिवाय शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे यावरून स्पष्ट होत आहे..
Comments
Post a Comment