निलंगा शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ....
निलंगा शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या प्रमाणात वाढ...
रस्त्यावरील अतिक्रमण व मद्यसेवन ठरत आहेत अपघातांचे कारण...
निलंगा,दि.१०
गेल्या काही महिन्यांपासून निलंगा शहर व परिसरात अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.अपघातातील मृतांची संख्या ही पूर्वीपेक्षा वाढल्याने हा चिंतेचा विषय बनत चालला आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण, भर रस्त्यात पार्किंग आणि मर्यादित नसलेला वेग व मद्यसेवन करणारे वाहनचालक हे प्रमुख कारण असले तरी यामध्ये केवळ वाहनधारकांची बेशिस्तपणा हे स्पष्टपणे लक्षात येत आहे.
निलंगा शहरातील ननंद रिंगरोड ते उदगीर मोड या रोडवरील निलंगा शहरात दिवसेंदिवस रस्त्यावर वाढत चाललेले अतिक्रमण व सुसाट वेगाने धावणारे अनेक मोटारसायकलस्वार ,ऑटोचालक व वाहने ,त्याचप्रमाणे वाहन चालकांच्या बेजबाबदार पणामुळे रस्ता ओलांडताना कंट्रोल न झाल्याने बरेच अपघात घडत असतात.
या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कासार सिरसी मोड ते पुढे उदगीर मोड या रस्तावर दोन्ही बाजूने अनेक छोट्या- मोठया व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून आपले व्यवसाय थाटल्यामुळे वाहन चालकांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.त्यातच निलंगा शहरात अल्पवयीन मोटार सायकल स्वारांनी तर शहरात उच्यांक गाठला आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.यामुळे पोलिस प्रशासन नगर पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे.
Comments
Post a Comment