जलतरंग स्पर्धेत हर्षवर्धन जाधवचे यश...
जलतरंग स्पर्धेत हर्षवर्धन जाधवचे यश...
चार पदकाची कमाई ...
निलंगा,दि.२५
सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला सैनिकी विद्यालयाच्या आठवी वर्गातील विद्यार्थी हर्षवर्धन जाधव यांनी नुकताच नेरूळ येथे झालेल्या महाराष्ट्र फिन्स जलतरण स्पर्धेत एक रौप्य व तीन कास्य पदक असे एकूण चार पदके जिंकले. या कामगिरीच्या आधारावर त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जलतरण स्पर्धेसाठी राज्यातून साडेचारशे जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता. वेगवेगळ्या चार गटांतून हर्षवर्धन जाधव याने सहभाग नोंदविला.चमकदार कामगिरी करताना शंभर मीटर सरफेस स्वीमिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावले २०० मीटर फ्रीस्टाईल बायफिन्स, ४ बाय ४०० मीटर फ्रीस्टाईल मिक्स रिले व ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल रिले या तिन्ही प्रकारात त्याने कास्यपदक पटकावले.
Comments
Post a Comment