निलंग्यात भाजपाला खिंडार शेकडो कार्यकर्ते काँग्रेस मध्ये दाखल...
निलंग्यात भाजपाला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात दाखल...
निलंगा,दि.२४
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या तथा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील - निलंगेकर यांचा मतदार संघ असलेल्या निलंगा शहरातील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे निलंगा तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निलंगा शहरातील ओमप्रकाश शिंदे, महेश लोंढे, शिवप्रसाद कांबळे, रणजित कांबळे, माधव शिंदे, धीरज कांबळे यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्त्याने काँग्रेसचे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी महाराष्ट्राचे सह प्रभारी कुणालजी चौधरी, आमदार धीरजभैया देशमुख,लातूर जिल्हा प्रभारी जितेंद्रजी देहाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव अभयदादा साळुंके, जिल्हाध्यक्ष श्रिशैलदादा उटगे, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, निलंगा तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी सभापती अजित माने, डॉ. अरविंद भातंबरे, शहर अध्यक्ष अजित नाईकवाडे, पंकज शेळके, लाला पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment