बहुजनांचा आधारवड दयानंद (अण्णा)चोपणे यांचे निधन...

बहुजनांचा आधारवड दयानंद(अण्णा) चोपणे यांचे निधन...

निलंगा,दि.१४ (मिलिंद कांबळे)

फुले ,शाहू,आंबेडकरांचे  विचार जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे  पोहचविण्यासह वंचितांसाठी लढा देणारा लढवय्या आणि चळवळीचा भाष्यकार दयानंद (अण्णा)  व्यंकटराव चोपणे यांचे दि.१५ रोजी सायंकाळी ०५ वाजता लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान वयाच्या ६३ व्या वर्षी  त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
निलंगा तालुका हा मानवतावादी - आंबेडकरवादी चळवळीचे केंद्र म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते.या महनीय  शृंखलेमध्ये दयानंद अण्णा चोपणे यांनी फुले,शाहू,आंबेडकर यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा मागोवा व सुनिश्चित दिशा आपल्या प्रतिभेतून एक निष्ठावंत कार्यकर्ता,वक्ता, व नेता म्हणून  स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडण्याचे काम केले.त्यांच्या आकस्मित जाण्याने मोठा धक्का बसला असून फुले ,शाहू,आंबेडकर चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.एक  सच्चा भाष्यकार गेल्याने जिल्हाभरात अतीव दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या जीवन कार्याचा आदर्श घेऊन नव्या पिढीने लिहिते राहून सामाजिक प्रश्नांना न्याय मिळवून देणे सदोदित मानवतावादी - आंबेडकरवादी चळवळ गतिमान करणे  हीच त्यांना आदरांजली ठरेल.
त्याचप्रमाणे  ते प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोकराव पाटील -निलंगेकर यांचे खंदे समर्थक,अशोकराव  पाटील मित्र मंडळाचे संस्थापक जिल्हाध्यक्ष  तसेच माजी  मुख्यमंत्री स्वर्गीय डॉ.शिवाजीराव पाटील - निलंगेकर (दादासाहेब) यांच्या छत्रछायेखाली वाढलेले व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते तथा  दलित बहुजन ओबीसीचा बुलंद आवाज आज  काळाच्या पडद्याआड झाल्याने मनाला वेदना देणारी घटना  आहे.अशा या महान कर्तत्वान बहुजन नेत्याला अखेरचा सलाम..
त्यांच्या पार्थिव देहावर दि.१६सप्टेंबर २०२४ रोजी सोमवारी येथील शांतिवन सार्वजनिक स्मशान भूमीत सकाळी साडेअकरा (११:३०) वाजता अंतिमसंस्कार होणार आहे.असे त्यांच्या  निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक बहिण, एक भाऊ ,दोन मुले, सूना  नातवंडे व पुतणे  असा मोठा  परिवार आहे.

मिलिंद कांबळे,निलंगा
मो.9960049411

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..